शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोट नगरपरिषदेकडून काढण्यात आलेले श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर प्रतिसादाअभावी पडून राहिले आहे. संबंधित कामासाठी एकाही कंत्राटदाराने किंवा संस्थेने निविदा दाखल न केल्याने निर्बीजीकरणाची मोहीम रखडली आहे. शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांकडून श्वानांच्या उपद्रवाबाबत वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत श्वानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढण्यात आलेल्या निविदेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळावा, यासाठी नव्याने निविदा काढण्याबाबत तसेच पर्यायी उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न गांभीर्याने हाताळून निर्बीजीकरणाची मोहीम लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. निर्बिजीकरणाकरिता अकोट नगरपरिषदेकडून चार वेळा निविदा करूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नसल्याने भटक्या कुत्र्यांना आवर घालणे कठीण झाले आहे. शहरातील विविध भागात दररोज कुत्रा चावल्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निर्बीजीकरणाचा ठेका रखडल्याने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नांना विलंब होणार असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर ^खानापूर परिसरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेऊन प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. – प्रवीण तेलगोटे, नागरिक. बंदोबस्तासाठी पर्यायी व्यवस्था करणार ^निर्बिजीकरणाकरिता चार वेळा निविदा काढूनही पात्र व्यक्ती / संस्था मिळाली नाही. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपण तात्पुरती पर्यायी व्यवस्था करणार आहोत. – शशिकांत बाबर, मुख्याधिकारी, नगरपरिषद. उपाययोजना करणार ^श्वानांच्या नियंत्रणासाठी निर्बीजीकरण हा प्रभावी उपाय मानला जातो. मात्र, यासाठी काढलेल्या निविदेला आजवर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता नागरिकांना दिलासा देण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणार . – माया धुळे, नगराध्यक्षा
Source link
श्वान निर्बीजीकरणाचे टेंडर पडून, चारदा निविदा काढूनही कंत्राटदार मिळेना:अकोटमध्ये भटक्या श्वानांची संख्या वाढल्याने नागरिक त्रस्त
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























