Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकभीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो प्रमुख देवस्थानांचा कायद्याच्या विरोधात रणशिंग ! राज्यभर घंटानाद,...

भीमाशंकर, अष्टविनायक मंदिरांसह शेकडो प्रमुख देवस्थानांचा कायद्याच्या विरोधात रणशिंग ! राज्यभर घंटानाद, महाआरती, स्वाक्षरी अभियान, तसेच मुंबईतून महाआंदोलनाचा सरकारला इशारा !

जमिनी वाचल्या, तरच देवस्थाने सुरक्षित राहतील – मंदिर विश्वस्तांचे ठाम मत

पुणे : “देवस्थानांच्या जमिनी वाचल्या तरच मंदिरे आणि आपले धर्मकार्य सुरक्षित राहील, त्यामुळे सरकारने या जमिनी अधिग्रहित करण्याचे काम तात्काळ थांबवावे,” असा ठाम व स्पष्ट इशारा देत भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान आणि अष्टविनायक समितीसह पुणे पंचक्रोशीतील शेकडो प्रमुख देवस्थानांनी ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन (प्रारूप) अधिनियम, २०२६’ या कायद्याच्या विरोधात पुण्यातून थेट रणशिंग फुंकले आहे. या जाचक कायद्याला कडाडून विरोध करण्यासाठी आणि सरकारला वेळेत पावले उचलण्याची चेतावणी देण्यासाठी मंदिर महासंघाच्या वतीने पुण्यात महत्त्वपूर्ण बैठका पार पडल्या.
      या कायद्याविरोधात पुढील २५ दिवसांत लाखो कायदेशीर हरकती नोंदवण्यासह, राज्यभर व्यापक स्वाक्षरी अभियान, प्रत्येक मंदिरात महाआरती, आगामी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर ‘घंटानाद आंदोलन’ आणि गरज पडल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर ‘महाआंदोलन’ छेडण्याचा, तसेच लवकरच ‘राज्यस्तरीय देवस्थान भूमी संरक्षक परिषद’ आयोजित करण्याचा एकमुखाने निर्धार करत मंदिर विश्वस्तांनी मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे.
पुण्यातील श्री सिद्धिविनायक मंदिर (सारसबाग), खंडोबा मंदिर (आकुर्डी) आणि श्री सियाराम मंदिर, गोशाळा (हडपसर) येथे पार पडलेल्या या बैठकांमध्ये ज्येष्ठ अधिवक्ता एस. के. जैन यांनी, देवस्थानांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांच्या जमिनी सुरक्षित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. माजी धर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी या कायद्यामागील शासनाचा हेतू संशयास्पद वाटत असल्याचे सांगत विश्वस्तांना जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याचे आवाहन केले. तसेच, रांजणगाव महागणपती देवस्थानचे विश्वस्त डॉ. तुषार पाटील पाचुंदकर यांनी अष्टविनायक मंदिरांचा या कायद्याला तीव्र विरोध दर्शवला, तर भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे यांनी सेवाधार्‍यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी केली. मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी हा लढा मंदिरांच्या अस्मितेचा असल्याचे सांगत २ जून रोजी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन राज्यभर आंदोलनाचा श्रीगणेशा केला जाईल, अशी चेतावणी सरकारला दिली.
या आंदोलनाची रणनीती निश्चित करण्यासाठी आणि प्रत्येक मंदिरात जनजागृतीचे फलक लावून व्यापक लोकचळवळ उभी करण्यासाठी राज्यभरातील प्रमुख विश्वस्त एकवटले आहेत. या बैठकांना भीमाशंकर देवस्थानचे कार्याध्यक्ष मधुकर गवांदे, प्रसाद गवांदे, ग्रामदैवत कसबा गणपतीच्या संगीताताई ठकार, भवानीपेठ पालखी मंदिराचे प्रमोद बेंगरूट, कानिफनाथ मंदिराचे ज्ञानोबा व सुरेश फडतरे, श्रीमंत सरदार खासगीवाले लिमये, निलेश वाळावे (शिरवळ), निवृत्ती बडदे (कोडीत), अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे वांजळे, जेजुरी मार्तंड देवस्थान व दगडूशेठ दत्त मंदिरचे अधिवक्ता थोरवे, आकुर्डी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल काळभोर व उपाध्यक्ष पंढरीनाथ काळभोर, तसेच चतुःश्रृंगी देवस्थानचे ट्रस्टी आणि अधिवक्ता वृषाली दातार यांसह विधी व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो विमानाला टेकऑफपूर्वी पक्षी आदळला:बंगळुरूहून मुंबईसाठी उड्डाण भरायचे होते, विमान एक तास उशिराने उड्डाण...

0
बंगळुरूहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट 6E-6283 ला शुक्रवारी संध्याकाळी टेकऑफच्या अगदी आधी बर्ड हिटचा फटका बसला. विमानाने संध्याकाळी 7:04 वाजता उड्डाण भरायचे होते,...

सातबारा फेरफारासाठी १४ हजारांची लाच:खिल्लारचा महसूल अधिकारी जाळ्यात

0
सेनगाव तालुक्यातील खिल्लार येथील तक्रारदाराची वडिलोपार्जीत जमीनीचा फेरफार करून सातबाराला लावण्यासाठी १४ हजाराची लाच घेतांना ग्राम महसूल अधिकाऱ्यास शुक्रवारी ता. ५ रात्री सात...

TMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेत

0
मराठी बातम्याराष्ट्रीयTMC सभापतींच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान; अभिषेक बॅनर्जी पक्षाचे सरचिटणीस आहेतकोलकाता6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराटीएमसीमध्ये फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जींनी शुक्रवारी पहिल्यांदाच वरिष्ठ नेत्यांसोबत...

5 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
५ जून, शुक्रवार रोजी मेष राशीच्या लोकांचे अडकलेले सरकारी प्रकरण कोणाच्यातरी मदतीने सुटू शकते आणि चांगले ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांना...
spot_img

पुरुष अंडर-18 हॉकी आशिया कप- भारताने पाकिस्तानला हरवले:सेमीफायनल 5-3 ने जिंकला; आशिष तानीने 4...

0
भारतीय अंडर-18 पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीत पाकिस्तानला 5-3 ने हरवले आहे. या विजयासह भारताने अंडर-18 पुरुष आशिया कप 2026 च्या अंतिम...

पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण संरक्षण का महत्त्वाचे आहे?, जाणून घ्या दोहन ते संवर्धन हा महत्त्वपूर्ण...

0
पर्यावरणाचे रक्षण करणे हा निसर्गावर कोणताही उपकार नाही, ही तर आपल्या स्वतःच्या श्वासांची आणि येणाऱ्या पिढ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे कारण जोपर्यंत निसर्ग सुरक्षित...

जुमांजी अभिनेता जेम्स हँडीची हत्या; मैत्रिणीच्या मुलाला अटक

0
55 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा'जुमांजी' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेले हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जेम्स हँडी यांची कॅलिफोर्नियातील त्यांच्या घरी हत्या करण्यात...

मारुतीने सादर केली देशातील पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर:85% मिश्रित पेट्रोलवर चालेल; केंद्रीय मंत्री पुरी...

0
मारुती सुझुकीने आज (४ जून) भारतात पहिली फ्लेक्स-फ्यूल कार वॅगन-आर फ्लेक्स-फ्यूल सादर केली आहे. नवीन वॅगन-आर पूर्णपणे E85 इंधनावर (८५% पर्यंत इथेनॉल मिश्रित...
error: Content is protected !!