Homeपुणे / पिंपरी-चिंचवडगणेशोत्सव निमित्त विशेष लेख

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

ब्रेकिंग न्यूज
गणपतीला लाल फुल का वाहतात ?गणेशोत्सव निमित्त विशेष लेखगणेशोत्सव निमित्त विशेष लेखशुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतोबुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यतासोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध राहावे लागेलरविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात संतुलन राखून पुढे जातीलशुक्रवारचे टॅरो राशिभविष्य:कर्क राशीच्या लोकांना तणावातून आराम मिळेल आणि कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेलश्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संशोधन विषयी विशेष लेख2 सप्टेंबरचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर आणि कुंभ राशीच्या लोकांना प्रॉपर्टीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते

गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?

     गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण देशभरात भक्तिमय वातावरण झालेले पाहायला मिळते. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि बाप्पाच्या आगमनाचा असीम उत्साह अशा निरामय वातावरणात सर्व परिसर न्हाऊन निघतो. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या धार्मिक व्रताला आवाढव्य मूर्तींच्या चढाओढीचे आणि हौशी स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही गणेश मंडळांच्या ‘आमची मूर्ती सर्वांत उंच’ या एकाच ध्येयासाठी सुरू झालेल्या या शर्यतीत आज भक्तांचा जीव पणाला लागत असून बाप्पाच्या आगमनाचा आनंद शोकांतिकेत परावर्तित होत आहे. हे अत्यंत धक्कादायक तर आहेच; पण आपल्याला अंतर्मुख करणारेही आहे.

उंच मूर्तींमुळे घडलेल्या दुर्घटनांची मालिका

     अलीकडच्या काळात घडलेल्या घटनांवर नजर टाकली, तर धक्कादायक चित्र समोर येत आहे. दक्षिण मुंबईतील ‘भुलेश्वरचा राजा’ या मंडळाच्या २२ फूट उंच मूर्तीची आगमनाची मिरवणूक सुरू असताना तोल जाऊन ती थेट गर्दीवर कोसळली. या भीषण दुर्घटनेत संकेत निवशे व ब्रिजेश जोशी या दोन निष्पाप कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला, तर चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले. जळगावच्या ‘जय महाराष्ट्र मित्र मंडळाने’ मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून ४७ हजार रुपये खर्च करून आणलेली १२ फूट उंच मूर्ती वाहतुकीदरम्यान वाटेतच दुभंगली. परिणामी, स्थापनेच्या आधीच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची नामुष्की मंडळावर ओढावली.

     अशाच प्रकारे मुंबईच्या धारावीतील ‘ओम शक्ती फाउंडेशन’च्या प्रेमनगरच्या महाराजाची १५ फूट उंच मूर्ती मिरवणुकीदरम्यान ट्रॉली उलटल्याने शीतल तलावाजवळ रस्त्यावर कोसळली. तिथे सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी मूर्ती भंगावल्याने स्थापनेपूर्वीच अपघाती विसर्जन करावे लागले. भाईंदर येथील ‘शीतल छाया मित्र मंडळा’च्या आगमनाच्या उत्साहातही मूर्तीचा तोल सुटून ती खाली कोसळली, ज्यामध्ये मूर्ती दुभंगण्यासोबतच अनेक कार्यकर्ते दुखापतग्रस्त झाले.

     ज्या बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आणि गल्लीबोळात आनंदाचे तरंग निर्माण व्हायला हवेत, तिथे कोणाचा जीव जाणे, गंभीर दुखापत होणे किंवा मूर्ती रस्त्यावर दुभंगावी, यापेक्षा दुःखद घटना अन्य कोणती असू शकेल? हा उत्सव आनंदाचा असायला हवा, पण तो भीती आणि चिंतेच्या सावटाखाली जात आहे. आता तर एका सेल्फीस्टिकमध्ये भ्रमणभाषच्या मधोमध बसवलेली श्री गणेशाची मूर्ती आणलेली दिसली आहे. त्याखाली कार्यकर्ते बसलेले दिसले. ज्या उद्देशाने हा उत्सव सुरू झाला ते बाजूला राहिले अन्‌ अन्य धोकादायक प्रकार सुरू झाले आहेत.

अहंकाराचे प्रदर्शन कि भक्तीचा विसर?

     ज्या भगवान गणेशाला आपण साक्षात अनुभवतो, तो साक्षात अवतरला आहे या भक्तिभावाने त्याच्याकडे पाहतो, तो केवळ एक मूर्ती आहे ही भावना वाढीस लागल्यावर काय दुष्परिणाम होतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. या भीषण घटनांमागे केवळ अपघात हे कारण नसून काही मंडळांची प्रसिद्धिलोलुप भूमिका, काही मंडळामंडळांमधील जीवघेणी चढाओढ आणि सुरक्षेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे.

     ५ ते १० टनांची आवाढव्य मूर्ती घडवणे आणि तिची वाहतूक करणे हे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकेदायक ठरत आहे. रस्त्यांवरील खड्डे, गतीरोधक, विजेच्या लटकणाऱ्या तारा, मोठे पूल, अरुंद रस्ते आणि वाहतुकीची कोंडी या वस्तुस्थितीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून अशा प्रचंड मूर्ती मिरवणुकीत आणल्या जातात. विसर्जनाच्या वेळी समुद्रात किंवा तलावात या विशालकाय मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन होणे अशक्यप्राय असते. क्रेनने मूर्ती पाण्यात लोटताना किंवा ती कोसळताना पाहणे, हे कोणत्याही खऱ्या गणेशभक्ताच्या हृदयाला अतिशय वेदना देणारे चित्र असते. अशा घटनांमुळे पर्यावरणाची हानी होणे, धार्मिक भावना दुखावणे, निष्पाप कार्यकर्त्यांचे जीव जाणे, दुखापत होणे आणि लाखो रुपयांचा चुराडा होणे इतकेच नाही, तर भगवान श्रीगणेशाचा घोर अवमान होतो, हे कार्यकर्ते व प्रशासन यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे.

शास्त्राचा आधार आणि प्रशासकीय अनास्था

     उत्सावात काय असावे आणि काय नसावे ? याबाबत सनातन संस्था आणि अनेक संत, अभ्यासक गेले अनेक वर्षे या संदर्भात सातत्याने प्रबोधन करत आहेत. खरे तर घरगुती गणेशमूर्ती ही १ ते दीड फुटांची किंवा सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्ती जास्तीत जास्त ३ ते ४ फूट उंचीची असावी. लहान मूर्तीमुळे अपघाताचा धोका रहात नाही. आगमन आणि विसर्जन अत्यंत विनासायास, शिस्तबद्ध आणि भक्तिभावाने पार पडते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रींच्या मूर्तीचे पूर्ण आणि सन्मानपूर्वक विसर्जन होते. दुर्दैवाने शासन आणि प्रशासनाकडून यासंदर्भात कठोर नियमावली आणि मूर्तींच्या उंचीची मर्यादा लादण्यामध्ये मोठी उदासीनता दिसून येते. प्रशासनाने वेळेवर योग्य नियम घातले असते आणि आवश्यक ती जागृती केली असती, तर आज कार्यकर्त्यांना प्राण गमवावे लागले नसते.

अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ

     मोठी आणि उंच मूर्ती आणल्यानेच गणपती नवसाला पावतो किंवा कृपा करतो, असा कुठल्याही धर्मशास्त्रात उल्लेख नाही. ईश्वर हा केवळ भावभक्तीचा भुकेला आहे. त्याला शुद्ध मनाने केलेला नामजप आणि श्रद्धेने अर्पण केलेले एक फूल देखील पुरेसे आहे. जर आपल्या अनावश्यक दिखाव्यामुळे कोणाचे प्राण जाणार असतील, देवाची मूर्ती रस्त्यावर भंगावणार असेल, तर त्याला गणेशोत्सव कसे म्हणावे? केवळ प्रशासनाने नियम घालावेत, एवढ्यावर हा प्रश्न थांबत नाही. गणेश मंडळांनीही स्वतःहून सुरक्षिततेला आणि भक्तीला प्राधान्य देऊन अनावश्यक उंचीच्या स्पर्धेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रत्येक गणेशभक्ताने आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. बाप्पाला स्वतःच्या आवाढव्य मूर्तींची नाही, तर आपल्या सात्त्विक भक्तीची गरज आहे. ही दिखावा संस्कृती थांबवून लहान, सुंदर आणि शास्त्रोक्त गणेशमूर्तींची स्थापना करूया; जेणेकरून हा उत्सव केवळ आणि केवळ अखंड आनंदाचा राहील, दुःखाचा नाही!

संकलक -श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!