Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर !

सचिन अंदुरे यांना दाभोलकर हत्या प्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर !

… हा तर सत्याचा विजय ! – सनातन संस्था

     मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले हिंदुत्वनिष्ठ सचिन अंदुरे यांना तपासातील गंभीर त्रुटी लक्षात घेऊन आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात अंदुरे यांनी उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. अंदुरे यांच्या या याचिकेला विरोध करत दाभोलकर परिवाराने ‘सचिन अंदुरे यांना जामीन देऊ नये’, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयाने त्यांची ही मागणी स्पष्टपणे धुडकावून लावत अंदुरे यांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे सनातन संस्थेवर आणि हिंदुत्वनिष्ठांवर खोटे आरोप करून त्यांना गोवण्याचे दाभोलकर कुटुंबियांचे षड्यंत्र आता उघडे पडले आहे; तसेच तपास यंत्रणांचा फोलपणाही उघड झाला असून हा सत्याचा मोठा विजय आहे, अशी भूमिका सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी मांडली आहे.

     उच्च न्यायालयामध्ये सचिन अंदुरे यांच्या जामिनासाठी युक्तिवाद करतांना ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान यांनी पुराव्यांमधील त्रुटींवर बोट ठेवले. सीबीआयसारख्या देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेने या प्रकरणात कोणतीही ‘ओळख परेड’ घेतली नव्हती. काहींनी सचिन अंदुरे यांना गोळ्या झाडतांना पाहिल्याचा दावा केला, तर काहींनी ते घटनास्थळी नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात मोठी तफावत होती. या, तसेच तपासातील अशा प्रकारच्या अनेक त्रुटी अधिवक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. हे सर्व लक्षात घेऊन न्यायालयाने हा जामीन मंजूर केला व शिक्षेला स्थगिती दिली आहे. यापूर्वी याच प्रकरणात एप्रिल महिन्यात हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता.

या विषयी श्री. वर्तक पुढे म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येनंतर कोणत्याही ठोस पुराव्याविना केवळ वैचारिक द्वेषातून सनातन संस्थेला लक्ष्य करण्यात आले. दाभोलकर कुटुंबियांनी ‘विशिष्ट विचारसरणीचा आवाज दाबण्याचा कट’ असल्याचा कांगावा करत सनातनवर बेछूट आरोप केले; परंतु विशेष न्यायालयाने यापूर्वीच डॉ. वीरेंद्र तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे या तीन हिंदुत्वनिष्ठांची निर्दोष मुक्तता केली होती. यामुळे दाभोलकर कुटुंबाचा न्यायालयात सपशेल पराभव झाला आहे. खऱ्या खुन्यांचा शोध घेण्यापेक्षा हिंदुत्ववाद्यांना अडकवण्याचाच त्यांचा हेतू होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

      तसेच सचिन अंदुरे यांना अटक झाली तेव्हा त्यांची मुलगी केवळ ६ महिन्यांची होती. आता सचिन अंदुरे आपल्या मुलीला भेटतील तेव्हा ती आठ वर्षांची झाली आहे. सचिन अंदुरे यांना मुलीचे ते बालपण पुन्हा मिळणार नाही. त्यांची मुलगी वडिलांच्या ज्या सहवासाला मुकली, तो सहवास तिला पुन्हा मिळणार नाही. मोठमोठे राजकारणी, पोलीस अधिकारी, सिनेकलावंत यांच्याशी जवळीक असलेल्या कुटुंबासाठी एका निष्पाप हिंदू मुलाचा कसा बळी दिला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सचिन अंदुरे! न्यायालयात अंदुरे यांच्या बाजूने लढा देणारे मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधान, अधिवक्ता शुभदा खोत, अधिवक्त्या सिद्धविद्या, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्यांच्या सर्व सहयोगी अधिवक्त्यांचे सनातन संस्था मनःपूर्वक आभार व्यक्त करते. अंतिम सुनावणीत हे दोन्ही हिंदुत्वनिष्ठ युवक निर्दोष मुक्त होतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असेही श्री. वर्तक यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!