Homeपुणे / पिंपरी-चिंचवडउन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित केलेल्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’ला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

उन्हाळ्याच्या सुट्टीत आयोजित केलेल्या ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’ला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गा’ला 488 बालकांचा सहभाग, 12 ठिकाणी नियमित संस्कार वर्गांची मागणी !

पुणे : भारतीय संस्कृतीत मंदिरे ही केवळ उपासनेची ठिकाणे नसून समाजाला संस्कार देणारी केंद्रे मानली जातात. याच परंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी सनातन संस्था आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने 9 ते 15 वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्गांचे’ आयोजन करण्यात आले होते. मंदिरांच्या सात्त्विक वातावरणात घेण्यात आलेले हे वर्ग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त तर ठरणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रा.विठ्ठल जाधव यांनी दिली.

सनातन संस्था मागील 26 वर्षांपासून विनामूल्य अध्यात्म प्रसाराचे कार्य करत आहे. आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये अधिक गुंतत आहेत. अशा वेळी त्यांना चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

 या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भोर,भोसरी, सिंहगड रस्ता, जुन्नर, हडपसर, चिंचवड तानाजी नगर,थेरगाव, विश्रांतवाडी, कोथरूड-वारजे,धनकवडी, बिबवेवाडी, शिवाजी नगर, पिंपरीगाव, कोथरूड, बारामती आणि प्राधिकरण या भागात शिबिरे यशस्वीपणे पार पडली. 26 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या शिबिरामध्ये आतापर्यंत 488 बालक सहभागी झाले. 185 पालक समारोपीय सत्रात सहभागी झाले. 12 ठिकाणी नियमित संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी पालकांनी आग्रही मागणी केली आहे.

  पाच दिवसांच्या या प्रशिक्षण वर्गात दररोज 3 तास मुलांना प्रार्थना, नामजप, आदर्श दिनचर्या, चांगल्या सवयी, नैतिक मूल्ये, भारतीय संस्कृती, कथाकथन, आध्यात्मिक खेळ आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचे मार्गदर्शन करण्यात आले. विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांच्या यशस्वी आयोजनात स्थानिक नागरिक,मंदिर विश्वस्त यांसह लोकप्रतिनिधींनी उत्तम सहकार्य केले. 

पालकांच्या अनुभूतीतून संस्कार वर्गांचे महत्त्व अधोरेखित !

काव्या ताडपत्री या बालिकेने सांगितले, “हे शिबिर मला खूप आवडले. ते आणखी काही दिवस असते तर मी नक्की सहभागी झाले असते.” तिच्या आईने प्रतिक्रिया देताना सांगितले, “येथे दिले जाणारे ज्ञान अत्यंत उपयुक्त आहे. असे मार्गदर्शन अन्यत्र मिळत नाही. दरवर्षी अशा शिबिरांचे आयोजन व्हावे.”

चव्हाण देसाई इस्टेट येथील एका बालिकेच्या मोठ्या बहिणीने सांगितले, “केवळ दोन दिवसांच्या शिबिरामुळेच तिचे मोबाईल पाहण्याचे प्रमाण कमी झाले आणि तिच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागला.”मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना, पुणे जिल्ह्यात विविध भागात आगामी काळात सुरू होणाऱ्या संस्कार वर्गांत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी व संपर्क : (7038713883)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!