Homeपुणे / पिंपरी-चिंचवडश्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संशोधन विषयी विशेष लेख

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त संशोधन विषयी विशेष लेख

सौंदर्याच्या पलीकडे: चित्रात देवतेचे पूर्ण रूप असणे

आध्यात्मिक ऊर्जा कशी वाढवते

पूजेचा मुख्य उद्देश ईश्वराप्रती भाव जागृत करणे आणि मनःशांती अनुभवणे हा आहे. पण एखाद्या देवी-देवतेच्या चित्राचा किंवा मूर्तीचा आकार, त्यातील देवतेच्या रूपाचीपूर्णता आणि सात्त्विकता हे ही आध्यात्मिक अनुभूती वृद्धिंगत करू शकतात का?

लाखो भाविक जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या मनमोहक चित्रांनी आणि मूर्तींनी आपल्या घरातील देवघर सजवण्याची तयारी करत आहेत. या सणाचा आपण अधिकाधिक आध्यात्मिक लाभ कसा मिळवू शकतो, हे जाणून घेऊया.

ईश्वरीय स्पंदनांचे विज्ञान

देवी-देवतांच्या चित्रांतून प्रक्षेपित होणाऱ्या आध्यात्मिक ऊर्जेचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’  च्या आध्यात्मिक संशोधन गटाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’चा वापर केला. हे सकारात्मक आणि नकारात्मक सूक्ष्म ऊर्जांचे मापन करणारे उपकरण आहे. यासाठी  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधक-कलाकारांनी तयार केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या आकारांच्या पाच चित्रांचा अभ्यास करण्यात आला.

अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये असे आढळले की, चित्राचा आकार वाढत गेला तसे त्याची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (ऑरा) देखील वाढत गेली. 2×3 इंचांच्या सर्वांत लहान चित्राची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 7.2 मीटर होती, तर 14×19 इंचांच्या चित्रात ती 21 मीटरपर्यंत वाढली. मात्र, सर्वांत मोठ्या 20×27 इंचांच्या चित्रात ही सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 21 मीटरवरून थेट 220 मीटरपेक्षा अधिक झाली.

यामध्ये केवळ आकारच नव्हे, तर चित्रातील देवतेच्या रूपाची पूर्णता हाही एक महत्त्वाचा घटक होता. पहिल्या चार चित्रांमध्ये श्रीकृष्णांना जानूपर्यंत (गुडघ्यांपर्यंत) दर्शवण्यात आले होते, तर सर्वांत मोठ्या चित्रात त्यांचे चरणांपर्यंतचे संपूर्ण स्वरूप दर्शवण्यात आले होते.

अध्यात्मशास्त्रानुसार, एखाद्या देवतेचे चित्र तिच्या वास्तविक स्वरूपाशी—अवयव, अस्त्रे-शस्त्रे आणि अलंकार यांसह—जितके अधिक साम्य दर्शवते, तितके ते त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यास सक्षम असते. यामुळे भक्ताला ईश्वराशी एकरूप होणे आणि अंतर्मनात भाव जागृत करणे अधिक सुलभ होऊ शकते.

सध्याच्या कालखंडात उपलब्ध देवतांच्या चित्रांमध्ये केवळ १-२ % देवतात्तत्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे.  सध्याच्या युगात  स्पंदन शास्त्रानुसार एखाद्या साधक-कलाकाराने बनवलेल्या देवतेच्या कलाकृतीमध्ये अधिकतम 30% देवतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. याउलट, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक-कलाकारांनी तयार केलेल्या या चित्रांमध्ये 31% देवतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता आढळली. चित्रनिर्मितीच्या वेळी कलाकारांची उच्च भावावस्था आणि चित्रनिर्मिती आपली साधना म्हणून करणे यामुळे हे साध्य झाले.

आपल्या घरात ‘पूर्णावताराचे’ स्वागत

भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार असल्यामुळे त्याचे अंशतः स्वरूप दर्शवणारी चित्रेही त्याच्या तत्त्वाचे प्रक्षेपण करतात. तरीही, मोठ्या आकाराचे आणि चरणांपर्यंत संपूर्ण स्वरूप दर्शवणारे चित्र ईश्वरीय स्पंदने अधिक व्यापक प्रमाणात प्रक्षेपित कऱते. इतर देवी-देवतांसाठीही चरणांपर्यंतचे संपूर्ण स्वरूप असलेले चित्र सर्वोत्तम असते.

या जन्माष्टमीला भावपूर्वक निर्मित केलेले मोठे, संपूर्ण स्वरूपाचे आणि सात्त्विक चित्र निवडणे हे केवळ सणानिमित्त औपचारिकता न रहाता, आपल्या घरात चैतन्यमय वातावरण निर्माण करण्याचे एक माध्यम ठरू शकते. यामुळे ईश्वराशी अधिक सखोल संबंध प्रस्थापित करणे आणि खरा आंतरिक आनंद अनुभवणे साध्य होईल.

तुम्हाला वेगवेगळ्या आकारांच्या किंवा प्रकारांच्या देवी-देवतांच्या चित्रांसमोर पूजा अथवा ध्यान करताना तुमच्या साधनेत कधी काही फरक जाणवला आहे का?

—  सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा

www.spiritual.university

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!