धारमशाला क्रिकेट स्टेडियम: भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम आता आयपीएल 2025 वरही झाला आहे. जगातील सर्वात मोठी लीगला एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. एवढंच नाही तर 8 मे रोजी धर्मशाला येथे सुरु असलेल्या सामन्याला अचानक थांबण्यात आलं. 58 वा सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. हा सामना धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला जात होता. पण सामान्यांच्या 10.1 षटकांनंतर अचानक सामना थांबवण्यात आला. काही काळातच स्टेडियम रिकामे करण्यात आले. सुरुवातीला सामना थांबवण्याचे कारण फ्लडलाइट्समधील बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. पण नंतर काही वेळेतच समजले की धर्मशालाच्या शेजारील शहर जम्मू आणि पंजाबमध्ये हवाई हल्ल्या झाला आहे आणि यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या सर्वात आव्हानात्मक दिवसांपैकी एक असलेल्या दिवसाबद्दल सांगितले आहे.
आयपीएल अध्यक्षांनी सांगितले धर्मशालेत नक्की काय घडले
आयपीएलचे (IPL 2025) अध्यक्ष अरुण धुमल यांना सामन्यादरम्यानच्या स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यान पहिल्यांदा लक्षात आले की धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ताबडतोब थांबवावा लागेल. कारण त्यावेळी जम्मू आणि पंजाबमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन आधीच वाजले होते. स्टेडियमच्या अवघ्या 100 किमी पेक्षा कमी अंतरावर होते. यावेळी, स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक होते आणि त्यांना याबद्दल काहीही माहिती न्हवती. अशा परिस्थितीत, अरुण धुमाळ यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे स्टेडियममधून 25,000 लोकांना कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी न होता सगळ्यांना बाहेर काढणे. सुरुवातीला, सामना थांबवण्याचे कारण फ्लडलाइट्समधील बिघाड असल्याचे सांगण्यात आले जेणेकरून तिथे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये.
हे ही वाचा: चेहऱ्यावर शांती आणि आनंद… धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral
काय म्हणले अरुण धुमाळ?
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, ” स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यान ब्लॅकआउट प्रोटोकॉलबद्दल मला माहिती देण्यात आली. आमच्याकडे खूप कमी वेळ होता. मी पटापट हालचाली केल्या आणि लगेचच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या टीममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले की, काही वेळात लाईट बंद केले जातील आणि आम्ही लोकांना बाहेर काढायचे हे काम कसे पार पाडायचे याचा प्लॅन करत आहोत. जेव्हा फ्लडलाइट्स बंद करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा लोक बाहेर पडायला तयार न्हवते. खरतर त्यावेळी पंजाब एकदम जबरदस्त पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे सामना खूपच मस्त सुरु होता. पण स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काम करण्यात आले. त्यांच्याशिवाय हे संपूर्ण काम शक्य नव्हते. त्यांनी खूप छान काम केले. कमीत कमी वेळेत सर्वकाही सुरळीतपणे घडेल याची खात्री करणे हे एक आव्हान होते. पण, स्टेडियममध्ये शिस्त पाळणारे प्रेक्षक होते ज्यांनी घोषणेनंतर जास्त निषेध न करता स्टेडियममधून बाहेर पडले.”
हे ही वाचा: रोहित पाठोपाठ विराट कोहलीही निवृत्तीच्या तयारीत; मात्र BCCI कडूनच होतोय विरोध
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांना पंजाब किंग्ज वि दिल्ली कॅपिटल सामन्यास धरमसाळात बोलावल्यानंतर लोकांना स्टेडियम सोडण्याची विनंती केली जात आहे.
: @rvmorthyhindu #Ipl2025 | #Pbksvsdc pic.twitter.com/bh9jmzayhc
– स्पोर्टस्टार (@sportstarweb) 8 मे, 2025
हे ही वाचा: Hardik Pandya: जवानाला बघून हार्दिक पांड्याने ठोकला सॅल्यूट, चाहत्यांचे जिंकले मन; Video Viral
आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित
आयपीएल 2025 (IPL 2025) सध्या फक्त एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल आणि आयपीएल पुन्हा कधी सुरू होऊ शकेल याबद्दल नंतरच माहिती दिली जाईल. बीसीसीआय उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करेल.
































