राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सध्या जोरदार चर्चेत असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, विधिमंडळ अधिवेशनातही त्यांच्या कामाच्या पद्धतीची आणि पारदर्शक कारभाराची प्रशंसा करण्यात आली. त्यांच्या या कडक शिस्तीचा आणि धडक कारवाईचा सकारात्मक परिणाम आता यंदाच्या आषाढी वारी यात्रा उत्सवातही पाहायला मिळणार असून, तसे संकेत खुद्द पालकमंत्र्यांनी दिले आहेत. आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे जिल्हा प्रशासनाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, आषाढी यात्रा कालावधीत पंढरपूर आणि पालखी मार्गावर येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना स्वच्छ व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आपण खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करून त्यांना विशेष लक्ष देण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कालच बुलढाण्यातील शेगाव येथे अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून मंदिर परिसरातील पेढ्यांचे नमुने जप्त केले असून, अशीच कडक नजर आषाढी वारीतही ठेवली जाणार आहे. 5 हजार एसटी बसेसची सुविधा वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासाची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांच्या सोयीसाठी परिवहन विभागाने तब्बल 5 हजार एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. यंदाच्या वारीत भाविकांना अधिकाधिक दर्जेदार व उत्तम प्रवास सुविधा पुरवण्याची ग्वाही परिवहन विभागाने दिल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. पालखी मार्गावर 10 हजार नवीन झाडे लावली जाणार याशिवाय, पर्यावरण आणि वारकऱ्यांच्या निवाऱ्याचाही विशेष विचार प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांचे नव्याने काम झाल्यामुळे, या रस्त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत मार्गावरील सावली देणारी अनेक जुनी झाडे तोडावी लागली होती. ही तूट भरून काढण्यासाठी आणि वारकऱ्यांना नैसर्गिक सावली मिळावी यासाठी, यंदा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पालखी मार्गावर तब्बल 10 हजार नवीन झाडे लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती गोरे यांनी दिली. भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूरचा दौरा करून पालखी मार्गासह चंद्रभागा नदीचे वाळवंट आणि 65 एकर परिसराची सविस्तर पाहणी केली. यंदा राज्यात ‘अल निनो’च्या संकटामुळे पाणीटंचाई असून पाण्यावर काही निर्बंध असले तरी, आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी चंद्रभागा (भीमा) नदीत पाणी सोडण्याबाबत आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती गोरे यांनी यावेळी दिली. तसेच, राज्यात सध्या पाण्याची टंचाई जाणवत असली तरी, पालखी मार्गावर मात्र वारकऱ्यांसाठी पाण्याची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Source link
आषाढी वारीतही असणार तुकाराम मुंढेंचे लक्ष:वारकऱ्यांना मिळणार स्वच्छ व दर्जेदार अन्न; मंत्री जयकुमार गोरेंकडून पूर्वतयारीचा आढावा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























