Homeमहाराष्ट्रTET पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक:6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग;...

TET पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक:6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग; आणखी दोन आरोपी फरार

ब्रेकिंग न्यूज
मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी अनिवार्य सुरक्षा चेकलिस्टरावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली रामायणाशी संबंधित स्थळांची झलकमोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान, संसदेला संबोधित केले:म्हणाले- सेशेल्ससोबत आमचे 256 वर्षांचे जुने नाते, 5 भारतीयांपासून याची सुरुवात झालीआयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढलेTET पेपरफुटी प्रकरणी तिघांना अटक:6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी, भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग; आणखी दोन आरोपी फरारभारताचे C-295 विमान उत्पादन आणि योग पदके; मोदी म्हणतात भारत सुरक्षितराम मंदिर देणगी चोरी- 8 आरोपींच्या घरी छापेमारी:एकाच वेळी छापा टाकला; टिन्नूच्या घराला कुलूप, पोलिसांकडून शेजाऱ्यांची चौकशी28 जूनचे राशिभविष्य:मिथुन राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ शकतोपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांतीकेतन अग्रवाल खून प्रकरण:आरोपी सिया, चेतनला घेऊन पोलिस लोहगड किल्ल्यावर, हत्येच्या ‘सीन रीक्रिएशन’साठी घटनास्थळी दाखल

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला भिवंडी पोलिसांकडून मोठी गती मिळाली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सखोल तपासासाठी पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आंतरराज्यीय रॅकेट सक्रिय असल्याचा दाट संशय असून, गुन्ह्यातील आणखी दोन मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात पकडण्यात आलेले धीरज बलराज सिंग (वय 28, रा. हरियाणा), राजीव साव (वय 45, रा. बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (वय 30, रा. बिहार) या तीन आरोपींना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान या आरोपींकडून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली. तसेच, या गुन्ह्यामागील आंतरराज्यीय साखळी उघडकीस आणण्यासाठी व फरार असलेल्या दोन संशयितांना पकडण्यासाठी कोठडीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात स्पष्ट केले. आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी हा पेपर नेमका कुठून आणि कसा लीक झाला, महाराष्ट्रात तो आणखी कुठे कुठे विकला गेला आहे का, यातील आर्थिक व्यवहार कशा प्रकारे व कोणासोबत झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे लागेबांधे आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेतली व आरोपींना 8 दिवसांची म्हणजेच 6 जुलैपर्यंतची पोलिस कोठडी मंजूर केली. आरोपी धीरज सिंगवर वैद्यकीय उपचार दरम्यान, सुनावणीच्या वेळी आरोपी धीरज सिंग याच्यावर यापूर्वी बॅरिएट्रिक (आतड्याची) शस्त्रक्रिया झाली असल्याने, त्याला नियमित औषधोपचारांची आवश्यकता असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर, आरोपीला आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार पोलिसांकडून दिले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली असून, आता या कालावधीत फरार आरोपींचा शोध, गुन्ह्यातील पैशांचा मार्ग आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान, संसदेला संबोधित केले:म्हणाले- सेशेल्ससोबत आमचे 256 वर्षांचे जुने नाते, 5...

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी सेशेल्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'गार्डियन ऑफ ब्लू होरायझन'ने सन्मानित करण्यात आले. यासह मोदींना आतापर्यंत 34 देशांचे सर्वोच्च नागरी...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
spot_img

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...

पोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती

0
मराठी बातम्याखेळपोर्तुगाल फुटबॉल विश्वचषक बाद फेरीचा टप्पा; रोनाल्डो ॲडव्हान्सेस, मेस्सीला विश्रांती2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फुटबॉल विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत...
error: Content is protected !!