Homeदेश-विदेशछत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!

१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा!  – हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन

  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे नव्हते, तर ते एक महान धर्मरक्षक आणि द्रष्टे युगपुरुष होते. आजपासून बरोबर ३५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने प्रवेश दिला होता. या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटनेला १९ जून २०२६ रोजी तब्बल ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक त्रिशताब्दी सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हा दिवस देशभरात ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना केले आहे.

     स्वराज्याचे पहिले सेनापती नेताजी पालकर यांना मुघलांनी कपटाने कैदेत टाकले होते. अत्यंत हालअपेष्टा करून त्यांना बळजबरीने मुसलमान बनवण्यात आले आणि त्यांचे नाव ‘मुहम्मद कुली खान’ असे ठेवण्यात आले. अनेक वर्षे परधर्मात आणि परभूमीत राहूनही नेताजींचे मन स्वराज्यासाठी तळमळत होते. जेव्हा ते मुघलांच्या तावडीतून सुटून पुन्हा रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी आले, तेव्हा महाराजांनी धर्मशास्त्रानुसार विधीवत त्यांचे ‘शुद्धीकरण’ केले. जेधे शकावलीनुसार शके १५९८, आषाढ वद्य ४ (१९ जून १६७६) या दि‍वशी नेताजी पालकर यांना पुन्हा हिंदु धर्मात स्वीकारण्यात आले.

     याविषयी बोलताना समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले की, आज ३५० वर्षांनंतरही हा इतिहास आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक आहे. विविध आमिषे, दबाव किंवा छळवणुकीला बळी पडून आपले लाखो हिंदु बंधू-भगिनी धर्मांतरित झाले आहेत. आजच्या काळात ‘लव्ह जिहाद’सारख्या सुनियोजित संकटाला बळी पडून आपल्या अनेक हिंदु युवती परधर्मात ओढल्या जात आहेत. ‘ती गेली तर जाऊ द्या, आता तिचा व आमचा काही संबंध नाही’, या मानसिकतेचा हिंदु समाजाने आता त्याग केला पाहिजे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून फसवल्या गेलेल्या आपल्या मुलींना आणि बहिणींना पुन्हा सन्मानाने हिंदु धर्मात आणि समाजात सुरक्षित स्थान देण्यासाठी या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समस्त हिंदु समाज, संत आणि संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे. जे बांधव आणि विशेषतः ज्या भगिनी मूळ प्रवाहात (हिंदु धर्मात) परत येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी आपण आपले दरवाजे आणि मने खुली केली पाहिजेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!