Homeमनोरंजनhow Ipl chairman arun Dhumal evacuated 25000 fans from Dharamshala cricket stadium...

how Ipl chairman arun Dhumal evacuated 25000 fans from Dharamshala cricket stadium amid India vs Pakistan war | 2 संघ, 25 हजारांहून अधिक प्रेक्षक अन्… IPL च्या अध्यक्षांनी सांगितले ‘त्या’ दिवशी धर्मशालेत नेमकं काय घडले?


धारमशाला क्रिकेट स्टेडियम: भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम आता आयपीएल 2025 वरही झाला आहे. जगातील सर्वात मोठी लीगला एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले आहे. एवढंच नाही तर 8 मे रोजी धर्मशाला येथे सुरु असलेल्या सामन्याला अचानक थांबण्यात आलं. 58 वा सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये ब्लॅकआउट करण्यात आला. हा सामना धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला जात होता. पण सामान्यांच्या 10.1 षटकांनंतर अचानक सामना थांबवण्यात आला. काही काळातच  स्टेडियम रिकामे करण्यात आले. सुरुवातीला सामना थांबवण्याचे कारण फ्लडलाइट्समधील बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. पण नंतर काही वेळेतच समजले की धर्मशालाच्या शेजारील शहर जम्मू आणि पंजाबमध्ये हवाई हल्ल्या झाला आहे आणि यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला. आता आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या सर्वात आव्हानात्मक दिवसांपैकी एक असलेल्या दिवसाबद्दल सांगितले आहे.

आयपीएल अध्यक्षांनी सांगितले धर्मशालेत नक्की काय घडले

आयपीएलचे (IPL 2025) अध्यक्ष अरुण धुमल यांना सामन्यादरम्यानच्या स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यान पहिल्यांदा लक्षात आले की धर्मशाळेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना ताबडतोब थांबवावा लागेल. कारण त्यावेळी जम्मू आणि पंजाबमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन आधीच वाजले होते. स्टेडियमच्या अवघ्या 100 किमी पेक्षा कमी अंतरावर होते. यावेळी, स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक होते आणि त्यांना याबद्दल काहीही माहिती न्हवती. अशा परिस्थितीत, अरुण धुमाळ यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे स्टेडियममधून 25,000 लोकांना कोणत्याही प्रकारची  चेंगराचेंगरी न होता सगळ्यांना बाहेर काढणे. सुरुवातीला, सामना थांबवण्याचे कारण फ्लडलाइट्समधील बिघाड असल्याचे सांगण्यात आले जेणेकरून तिथे भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये.

हे ही वाचा: चेहऱ्यावर शांती आणि आनंद… धर्मशाळेहून वंदे भारत ट्रेनने सुरक्षित परतला पंजाब आणि दिल्लीचा संघ, खेळाडूंचा Video Viral

काय म्हणले अरुण धुमाळ?

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, ” स्ट्रॅटेजिक टाइमआउट दरम्यान ब्लॅकआउट प्रोटोकॉलबद्दल मला माहिती देण्यात आली. आमच्याकडे खूप कमी वेळ होता. मी पटापट हालचाली केल्या आणि लगेचच दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जच्या टीममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले की, काही वेळात लाईट बंद केले जातील आणि आम्ही लोकांना बाहेर काढायचे हे काम कसे पार पाडायचे याचा प्लॅन करत आहोत. जेव्हा फ्लडलाइट्स बंद करण्याची घोषणा करण्यात आली तेव्हा लोक बाहेर पडायला तयार न्हवते. खरतर त्यावेळी पंजाब एकदम जबरदस्त पद्धतीने  फलंदाजी करत होता, त्यामुळे सामना खूपच मस्त सुरु होता. पण स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या मदतीने काम करण्यात आले. त्यांच्याशिवाय हे संपूर्ण काम शक्य नव्हते. त्यांनी खूप छान काम केले. कमीत कमी वेळेत सर्वकाही सुरळीतपणे घडेल याची खात्री करणे हे एक आव्हान होते. पण, स्टेडियममध्ये शिस्त पाळणारे प्रेक्षक होते ज्यांनी घोषणेनंतर जास्त निषेध न करता स्टेडियममधून बाहेर पडले.”

हे ही वाचा: रोहित पाठोपाठ विराट कोहलीही निवृत्तीच्या तयारीत; मात्र BCCI कडूनच होतोय विरोध

हे ही वाचा: Hardik Pandya: जवानाला बघून हार्दिक पांड्याने ठोकला सॅल्यूट, चाहत्यांचे जिंकले मन; Video Viral

आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित

आयपीएल 2025 (IPL 2025) सध्या फक्त एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यानंतर परिस्थितीचा पुन्हा आढावा घेतला जाईल आणि आयपीएल पुन्हा कधी सुरू होऊ शकेल याबद्दल नंतरच माहिती दिली जाईल. बीसीसीआय उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!