Homeमनोरंजनविराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 100 व्या अर्ध्या शतकाच्या धावा करणारा पहिला...

विराट कोहली टी -20 क्रिकेटमध्ये 100 व्या अर्ध्या शतकाच्या धावा करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला


आयपीएल 2025: राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Rajasthan Royals VS Royal Challengers Bengluru) यांच्यात आयपीएल 2025 चा 28 वा सामना पार पडला. या सामन्यात आरसीबीने 9 विकेटने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला असून यासह विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या दमदार परफॉर्मन्सने इतिहास रचला आहे. विराटने या सामन्यात टी 20 क्रिकेटमधील त्याचं 100 वं अर्धशतक ठोकलं असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय.

जयपूर येथील स्टेडीयमवर रविवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून आधी बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 173 धावा केल्या. आरसीबीला विजयासाठी 174 धावांची आवश्यकता असताना विराट कोहलीने 62, फिलिप सॉल्टने 65 आणि देवदत्त पड्डीकलने 40 धावा केल्या. विराट कोहलीने 33 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावा केल्या. यासह राजस्थान विरुद्ध विराटने ठोकलेलं हे अर्धशतक विराटच्या टी 20 करिअरमधील 100 वं अर्धशतक होतं. अशी कामगिरी करणारा विराट हा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरलंय. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याने सर्वप्रथम टी 20 क्रिकेटमध्ये अर्धशतकाचं शतक करण्याची कामगिरी केली होती. सध्या त्याच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये 108 अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड आहे.

हेही वाचा : CSK मध्ये ऋतुराजच्या जागेवर खेळणार मुंबईचा खेळाडू? IPL ऑक्शनमध्ये राहिलेला Unsold

109 वेळा केलं अर्धशतक :

विराट कोहलीने आतापर्यंत 405 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्याने 9 शतके आणि 100 अर्धशतक लगावून 13134 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 41.50 होती. टी 20 मध्ये सर्वाधिक अर्धशतकाच्या बाबतीत बाबर आझम तिसर्‍या क्रमांकावर असून त्याने आपल्या करिअरमध्ये 90 अर्धशतक केली आहेत. तर ख्रिस गेल 88 अर्धशतकांसह नंबर चारवर तर जोस बटलर 86 अर्धशतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज :

कोहली हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने स्पर्धेत 8252 धावा केल्या असून आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवन 6769 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट आणि शिखर धवन यांच्या धावसंख्येत 1500 धावांचं अंतर आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ नवे लष्करप्रमुख:जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील; 2 महिन्यांपूर्वी बनले...

0
केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारतीय लष्कराचे नवे प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून नियुक्ती केली आहे. सेठ सध्या उपसेनाप्रमुख (व्हाईस...

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला...

0
कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये...

13 जूनचे राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता, मीन राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळण्याची...

0
शनिवार, 13 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी पेमेंट गोळा करण्यासाठी चांगला दिवस आहे आणि आयात-निर्यात व्यवसायात नवीन फायदेशीर संपर्क निर्माण होऊ शकतात. सिंह...

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...
spot_img

2 वेगवान गोलंदाजांनी राजस्थानची साथ सोडली:आता हरियाणा आणि गुजरातकडून खेळणार; IPLमध्ये 154 किमी प्रतितास...

0
राजस्थानचे 2 वेगवान गोलंदाज अशोक शर्मा आणि गणेश सुथार आता राजस्थानकडून क्रिकेट खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडूंनी राजस्थान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) कडून ना हरकत...

वैभव सूर्यवंशीच्या धाकट्या भावाने शतक केले:10 वर्षांच्या आशीर्वादने 21 चौकार मारले; वडील म्हणाले होते-...

0
वैभव सूर्यवंशीनंतर आता त्याचा धाकटा भाऊ आशीर्वाद सूर्यवंशी देखील क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. 10 वर्षांच्या आशीर्वादने समस्तीपूर येथे खेळल्या गेलेल्या एका स्थानिक सराव सामन्यात...

नव्या पिढीत वाढत आहे डिजिटल थकवा:आता ऑफ ग्रिड प्रवास; 47% पालक, 30% मुले साधे...

0
एक काळ असा होता, जेव्हा लोकांमध्ये, विशेषतः तरुण पिढीमध्ये डिजिटल साधने आणि सोशल मीडिया स्वीकारण्याची स्पर्धा लागली होती. पण आता चित्र बदलत आहे....

मूव्ही रिव्ह्यू- गव्हर्नर:देश दिवाळखोर होण्यापासून वाचवण्याची कथा, मनोज वाजपेयींनी कठीण विषयही रंजक बनवला

0
आजचा भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो, पण एक काळ असाही होता, जेव्हा देशाला आवश्यक वस्तू आयात करण्यासाठीही पैसे उरले नव्हते. परकीय चलन...
error: Content is protected !!