महाराष्ट्र (नागपूर) : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या जंगल व्याप्त चिखला येथे १७ एप्रिल रोजी रात्रीच्या दरम्यान एका पट्टेदार वाघाने शिकारीसाठी जंगलातील रानडुकरांचा पाठलाग करीत असताना रानडुकरासह वाघाचा येथील कवनलाल धुर्वे नामक शेतकऱ्यांच्या शेतात चिखला येथील शेतकरी कवनलाल धुर्वे हे सकाळी आपल्या शेतावर गेले असता, त्यांना त्यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यात पट्टेदार वाघ व रानडुक्कर मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान शेतकरी कवनलाल धुर्वे यांनी सदर घटनेची माहिती नाका डोंगरी वनपरीक्षेत्र कार्यालयाला दिली. माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन वाघ व रानडुकराचे शव विहिरीबाहेर काढले. वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी व पशुसंवर्धन अधिकारी यांच्या उपस्थितीत वाघाचे व रानडुकराचे शवविच्छेदन करून घटनास्थळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ.दिव्यमराठी.






























