Homeपुणे / पिंपरी-चिंचवडभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचा समारोप

पुणे (दि.14): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, पुणे विभाग, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात अभिवादन कार्यक्रमात सामाजिक समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला.

यावेळी प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण वंदना कोचुरे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुणेचे उपायुक्त संजय दाणे, संशोधन अधिकारी संतोष जाधव, सहायक आयुक्त विशाल लोंढे, सहायक लेखाधिकारी इंदल चव्हाण आदी उपस्थित होते.

श्रीमती कोचुरे यांनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची जयंती साजरी करण्याचा हेतू बाबत माहिती दिली. तसेच महामानवांचे कार्य, त्यांचे विचार, आपल्या कडून अपेक्षित असलेले वर्तवणूक आदीबाबत मार्गदर्शन केले.

श्री. दाणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विविध महाविद्यालयांमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचे विशेष शिबिरांचे आयोजन करुन विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. लोंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचार घेवून जीवनाची वाटचाल यशस्वीपणे करण्याबाबत मार्गदर्शन केले.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या लाभ देण्यात आलेल्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये परदेशी शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबविण्यास सहकार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्था, पारलिंगी व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, पुणे शहरातील वृध्दाश्रमाचे संचालक, मिनी ट्रॅक्टर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणेत आले. सानिका जाधव यांनी”मी रमाई बोलतेय” हा एकपात्री नाटकाचा प्रयोग सादर केला.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!