Homeपुणे / पिंपरी-चिंचवडदाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !

दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !

अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार? – सनातन संस्था

मुंबई : दाभोलकरांच्या खूनानंतर तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तासाभरातच थेट हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडे बोट दाखवले आणि तपास त्या दिशेनेच चालू झाला. ‘प्लँचेट’चा वापर करून सनातन संस्थेचे नाव दाभोलकर (त्यांचा आत्मा!) घेत आहे, असे दाखवले जात होते, तर कधी तसे थेट आरोप दाभोलकरांचे कार्यकर्ते करत होते. हे सर्व चालू असतांना सनातन संस्था आणि तिच्या साधकांनी संपूर्ण तपासाला शांतपणे तोंड दिले. कधीही ‘तपासयंत्रणांना सहकार्य केले नाही’, असा आरोप संस्था किंवा संस्थेच्या साधकांवर झाला नाही. या पार्श्वभूमीवर वर्ष २०१५ ते २०२३ या काळात या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालू होता. मग अशा परिस्थितीत तपासात संस्थेच्या विरोधात काहीच मिळाले नाही. पाच जणांपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता सत्र न्यायालयाने यापूर्वीच केली आहे. शिक्षा झालेल्या दोघांपैकी एकाचा म्हणजे शरद कळसकर या हिंदुत्वनिष्ठ युवकाचा जामीन आज मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने ‘आरोपी शरद कळसकर घटनास्थळी होता, हेच सिद्ध झालेले नाही’, असे मानून हा जामीन दिलेला आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. गेली १० वर्ष सनातन संस्था सांगत होती की, यात संस्थेचा सहभाग नाही, तरी पुन्हा पुन्हा संस्थेला गुंतवण्याचा प्रयत्न झाला. निदान आता न्यायालयाच्या निर्णयांनंतर तरी हे लोक शांत बसतील का? असा प्रश्न सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी यांनी केला.

श्री. वर्तक पुढे म्हणाले की, या प्रकरणात वेळोवेळी दाभोलकर कुटुंबियांची ‘दाभोलकरांचे खरे खुनी नाही सापडले तरी चालतील, किंबहुदा खरे खुनी सोडा; पण सनातनच्या साधकांना वाट्टेल ते करून अडकवा’, अशीच भूमिका शेवटपर्यंत राहिलेली दिसली. याचा अर्थ त्यांना दाभोलकरांच्या खऱ्या खुन्यांशी देणेघेणे नसून, केवळ हिंदुत्ववाद्यांना चिरडायचे होते. आम्ही हिंदु संघटना म्हणून अन्याय झालेल्या प्रत्येक हिंदूंच्या पाठीशी आहोत आणि यापुढेही राहू. या जामीनासाठी न्यायालयीन लढा देणारे ज्येष्ठ अधिवक्ता नितीन प्रधानजी, अधिवक्त्या सिद्धविद्याजी, अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकरजी, अधिवक्ता शुभदा खोतजी आणि सहयोगी सर्व अधिवक्त्यांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा आहे की, या दोघांनाही न्याय मिळून लवकरच हेही निर्दोष मुक्त होतील.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!