मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक शेतकऱ्यांच्या तसेच शेतीच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ज कसे मिळू शकेल यावर विशेष भर दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्याची सीबीलसाठी अडवणूक करायची नाही, असे आदेशही त्यांनी बँकांना दिले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, एचएसबीसीच्या बैठकीत एकूण कर्ज वाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळू शकेल या संदर्भात तजवीज करण्यात आली. विशेषतः असे लक्षात आले की, साधारणपणे आपल्या ज्या जिल्हा सहकारी बँक आहेत आणि ग्रामीण बँक, या मिळून 67 टक्के शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते आणि राष्ट्रीयकृत बँका या 26 टक्के शेतकऱ्यांना फक्त कर्ज देतात. सीबीलसाठी कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, डीसीसीचे जे काही टार्गेट अचिव्हमेंट आहे ते 80 टक्क्यांच्या वर आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे मात्र 67 टक्के आहे. त्यामुळे आज अतिशय कडक शब्दांत राष्ट्रीयकृत बँकांना असे सांगण्यात आले आहे की त्यांनी 80 टक्क्यांच्या वर टार्गेट पूर्ण केले पाहिजे. दुसरे त्यांना हे सांगण्यात आले आहे की सीबीलची मागणी केली जाऊ नये. या संदर्भात मी सगळ्या बँकांना सांगितले आहे की हेडक्वार्टरमधून प्रत्येक ब्रांचला त्यांनी पत्र पाठवून सांगितले पाहिजे की क्रॉप लोडसाठी सीबीलची आवश्यकता नाही. तसेच सीबीलसाठी कुठल्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही. या संदर्भात आज आपण आदेश काढेल आहेत. बँकांसोबत कर्ज माफीच्या संदर्भात चर्चा यासोबतच या बँकांसोबत आम्ही कर्ज माफीच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आहे. जी काही कर्ज माफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या खात्यांवर जो काही त्यांना कट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉरमॅट त्यांनी द्यायची, कुठल्या फॉरमॅटमध्ये आम्ही ती करायची, याबाबत चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यावर सध्या अल निनोचे संकट देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात विशेषतः सगळ्यात मोठा हंगाम हा खरीपाचा असतो, त्यानंतर रबी आणि उन्हाळी पीक लोक घेतात. साधारणपणे खरीपाचे जे क्षेत्र आहे ते 152 लाख हेक्टरचे क्षेत्र आहे आणि यात साधारणपणे सगळ्यात मोठे क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस जवळपास 88 लाख हेक्टर त्या ठिकाणी असते. आत्ता जो काही या वर्षीचा खरीप हंगाम आहे यात मोठे संकट आहे ते अल निनोचे संकट आहे. आज हवामान खात्याने जी काही मांडणी केली आहे त्यात जे काही लॉन्ग टर्म अॅवरेज आहे पावसाचे ते 88 टक्के असेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तरी वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात याची तीव्रता अधिक असण्याची शक्यता आहे. उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता आजच्या खरीप हंगामच्या बैठीत आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार प्लॅनिंग कसे करता येईल हा प्रयत्न आपण केला आहे. विशेषतः साधारणपणे उतरत्या क्रमाने पाऊस असण्याची शक्यता जास्त आहे. जूनमध्ये येईल, त्या पेक्षा कमी जुलैमध्ये, त्यापेक्षा कमी ऑगस्टमध्ये आणि त्यापेक्षा कमी सप्टेंबरमध्ये असेल हा प्राथमिक अंदाज आहे. पावसाच्या दोन दिवसांमध्येही अंतर येण्याची शक्यता आहे आणि याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे पडलेला पाऊस थांबवू शकलो तर त्यात प्रोटेक्टिव्ह इरीगेशन करता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याला अल निनोचे नियोजन करण्याच्या सूचना पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता प्रत्येक जिल्ह्याला आपण अल निनोच्या संदर्भातील नियोजन करण्यासाठी दिले आहे. त्या संदर्भात थोडे वाण आणि बियाणे कसे उपलब्ध करून दिले जाईल याचे प्रयत्न असणार आहेत. प्रशासन असेल किंवा कृषी विद्यापीठ असतील यांना आपण या संकटाला सामोरे जाण्यास सज्ज राहण्यास सांगितले आहे. कमी पाण्यात आपण कसे काम केले पाहिजे यावर देखील विचार केला जात आहे.
Source link
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न:कुठल्याही शेतकऱ्याची CIBIL साठी अडवणूक करायची नाही, CM देवेंद्र फडणवीसांचे बँकांना आदेश
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























