Homeमहाराष्ट्रपुणे RCC कोचिंग क्लासवर ₹3.20 कोटींहून अधिक कर थकबाकीवर शिक्कामोर्तब

पुणे RCC कोचिंग क्लासवर ₹3.20 कोटींहून अधिक कर थकबाकीवर शिक्कामोर्तब


पुणे महानगरपालिकेने जंगली महाराज रस्त्यावरील प्रसिद्ध ‘आरसीसी पॅटर्न कोचिंग क्लास’वर मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर वापर आणि ३ कोटी २० लाख रुपयांचा थकीत मिळकत कर यामुळे महापालिकेने क्लासच्या आवाराला टाळे ठोकून ते सील केले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात

.

पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६ च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. डेक्कन येथील ‘बोरावके टॉवर्स’मधील ‘नालंदा कॅम्पस’च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील क्लासला महापालिकेच्या पथकाने सील ठोकले.

महापालिकेने ठोठावली नोटीस

महापालिकेने जागेचे मालक/विकसनकर्ते श्रीराम जोशी आणि आर.सी.सी. मोटेगावकर क्लासेस यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६८ (१) (ओ) अन्वये ‘जागेच्या विनापरवाना वापराबाबत’ कायदेशीर नोटीस बजावली आहे. शिवाजीनगर येथील सि.स.नं. १२५६/२अ, फा.प्लॉट नं. ६२१/२अ मधील सदनिकेमध्ये पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अंतर्गत फेरबदल करून निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर सुरू होता, असे नोटीसमध्ये नमूद आहे.

तपासणीत असे स्पष्ट झाले की, पहिल्या मजल्यावरील शॉप नंबर ९, दुसरा मजला आणि तिसऱ्या मजल्यावर विनापरवाना पद्धतीने वर्ग चालवले जात होते. या इमारतीवर महापालिकेने ३ कोटी २० लाख रुपयांचा मिळकत कर थकीत ठेवला आहे, जो तातडीने भरणे आवश्यक असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

क्लासचे साहित्य महिन्याभरात काढण्याचा इशारा

कारवाईदरम्यान क्लासच्या मुख्य दरवाजावर नोटीस लावून प्रशासनाने दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील सर्व शैक्षणिक साहित्य, बाकडी, लोखंडी कपाटे आणि फ्लेक्स एक महिन्याच्या आत काढून घेऊन मजले रिकामे करण्याची मुदत दिली आहे. दिलेल्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली जाईल आणि या कारवाईचा संपूर्ण खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असेही बजावण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त, इमारतीच्या तळघरात लोखंडी पत्रे लावून तयार केलेले अनधिकृत तात्पुरते कार्यालय महापालिकेने जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकले आहे. मनसेने या इमारतीवर कारवाई करण्यासाठी पुणे मनपा आंदोलन केले होते, त्यानंतर पुणे मनपा आयुक्तांनी इमारत सील करण्याचे आश्वासन दिले होते.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!