Homeमहाराष्ट्रसातारा जिल्ह्यातही 'कॉक्रोच जनता पार्टी'ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन...

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित केले प्रश्न

देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील श्री धुळोबा मंदीरात आज पार पडलेल्या धुळदेव ग्रामपंचायतिच्या ग्रामसभेत सचिन शिंगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे पोस्टर लावत ग्रामसभेत आक्रमकपणे विविध प्रश्न उपस्थित केले. भारताचे ५३ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मे २०२६ मधील एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि RTI च्या माध्यमातून व्यवस्था खराब करतात, तसेच ते “झुरळांसारखे” असल्याचे विधान केल्याचा आरोप झाला होता. या विधानाच्या निषेधार्थ अभिजीत दिपके या तरुणाने ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही व्यंगात्मक मोहीम सुरू केली. सोशल मीडियावर या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो तरुण त्यात सहभागी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर धुळदेव येथील ग्रामसभेतही या आंदोलनाची झलक पाहायला मिळाली. सचिन शिंगाडे यांनी ग्रामसभेत गावातील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले. त्यांच्या या भूमिकेमुळे ग्रामसभेत काही काळ चांगलीच चर्चा रंगली. सचिन शिंगाडे हे धुळदेव गावचे रहिवासी असून, गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या विकासासाठी सक्रियपणे काम करत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक प्रश्न सातत्याने मांडले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून ते पत्रकारिता करत असून सोशल मीडियावर त्यांचे तब्बल चार ते पाच लाख फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या मोहिमेला पाठिंबा दिल्यानंतर अनेक तरुण या आंदोलनाकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसत आहे. माण तालुक्यात आता ही मोहीम आणखी वेगाने पसरते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!