Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी !

सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी !

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना ‘हिंदु संघटन’ हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. 

 या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते.

 या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून ‘हलाल जिहाद’सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि ‘वक्फ बोर्डा’च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 

  सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 

  सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे.

   सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे.

  सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.

  या वाहनफेरीला आणि सभेला अधिकाधिक हिंदूंनी वेळेत उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य पार पाडावे, तसेच 8983335517 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!