Homeपुणे / पिंपरी-चिंचवडविविध क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर : ॲड. आशिष शेलार

विविध क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर : ॲड. आशिष शेलार

‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे उत्साहात उद्घाटन; २४ स्टार्टअप्सना बक्षिसे, गुंतवणूकदारांशी थेट संवादाची संधी

पुणे (दि.10) : “आजच्या आधुनिक युगात विविध क्षेत्रांतील आव्हानांवर मात करण्यासाठी नवकल्पनाच हा सर्वोत्तम मार्ग आहे. मात्र या नवकल्पनांना पोषक वातावरण व व्यासपीठांची सतत गरज आहे. त्यामुळेच अशा व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, जेणेकरून समाजाच्या तळागाळातील कल्पना देखील पुढे येतील,” असे प्रतिपादन राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले.

उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले. यावेळी दीपप्रज्वलनाने या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ॲड. शेलार यांच्या हस्ते सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना सन्मानित करण्यात आले.

डेस्टिनेशन को वर्किंग, पुणे बिझनेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुप, टीडीटीएल, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी चंद्रकांत पाटील, डॉ. राहुल कराड, डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, अमृता व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

“भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाला समान संधी व संरक्षणाची हमी देते. त्याला अनुसरून शहरी व ग्रामीण भागांतील नवकल्पनांना व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. अशा स्टार्टअप प्रदर्शनांमुळे नवकल्पनांची वास्तवातील चाचणी होते आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठा टप्पा गाठला जातो,” असेही शेलार यांनी सांगितले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कोविड काळात स्टार्टअप्सच्या संकल्पना कशा समोर आल्या, याचा मागोवा घेतला. “वर्क फ्रॉम होम संस्कृतीत डेस्टिनेशन को वर्किंगने महत्वाची भूमिका बजावली असून, त्यात कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या चर्चांतून स्टार्टअप एक्स्पोची कल्पना उदयास आली,” असेही त्यांनी नमूद केले.“२०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना उद्योजक बनवून देश संपन्न करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी नवे शैक्षणिक धोरण, प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती व मातृभाषेतील शिक्षण यास प्राधान्य दिले गेले. त्यामुळे आज भारतातील महिला स्टार्टअप्स जागतिक पातळीवर पहिल्या क्रमांकावर आहेत,” अशी माहितीही त्यांनी दिली.

एमआयटीचे डॉ. राहुल कराड यांनी विद्यार्थ्यांना नेहमीच नवकल्पनांसाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले. “स्टार्टअप एक्स्पोला पाठिंबा देणे, हे एमआयटीच्या कार्यप्रणालीचा एक भाग आहे,” असे ते म्हणाले.

एक्स्पोच्या संयोजिका अमृता देवगांवकर यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे नवोदित उद्योजक व विद्यार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले असून, यामार्फत स्टार्टअप्सना बाजारपेठेत ओळख निर्माण करण्याची आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मिळेल.” मंदार देवगांवकर व अमित आंद्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गार्गी कुलकर्णी यांनी केले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!