Homeमहाराष्ट्रProblems of 189 beneficiaries resolved at Samadhan Camp in Hatta | हट्टा...

Problems of 189 beneficiaries resolved at Samadhan Camp in Hatta | हट्टा येथे समाधान शिबीरात 189 लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या: वसमत तहसील कार्यालयाचा पुढाकार, फेरफाराची 17 प्रकरणे निकाली – Hingoli News

वसमत तालुक्यातील हट्टा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने गुरुवारी ता. ८ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर घेण्यात आले. यावेळी १८९ लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांचे समाधान करण्यात आले. यावेळी तहसीलदार शारदा दळवी यांनी मार्गदर्

?

हट्टा येथे तहसील कार्यालयाच्या वतीने शेतकरी तसेच नागरीकांचे प्रश्‍न जलद गतीने सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीर झाले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबीरात तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथकही हजर होते.

यावेळी तहसीलदार दळवी यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी, गावकऱ्यांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लागावेत तसेच त्यांच्या अडचणींची गाव पातळीवरच सोडवणुक व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत हे शिबीर घेतले जात असल्याचे सांगितले. या शिबीरात जास्तीत जास्त नागरीकांनी अडचणी मांडाव्यात व त्यांची सोडवणुक करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शिबीरामध्ये जिवंत सातबारा अंतर्गत २१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या शिवाय फेरफाराची १७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. याप्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन सदर प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची ८ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ९ प्रकरणांत शिधापात्रिकेत नांवे समाविष्ट करण्यात आली आहेत. ८ लाभार्थ्यांना नवीन शिधापत्रिका देण्यात आल्या असून सात जणांना दुय्यम शिधापत्रिका देण्यात आल्या. तसेच दोन जणांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झाली असून ११ जणांना आयुष्मान कार्ड देेण्यात आले. तर ३१ जणांचे आधारकार्ड अपडेट करून देण्यात आले आहे. या शिबीरामुळे गावपातळीवरच सर्व प्रकरणांची सोडवणुक झाल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चंपत राय राजीनाम्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्लीत:RSS राम मंदिर देणगी चोरीचा तयार करत आहे अहवाल

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमधून राजीनामा दिल्यानंतर, चंपत राय रविवारी संध्याकाळी अयोध्येहून दिल्लीसाठी रवाना झाले. ते दुपारी तीन वाजेपर्यंत राम मंदिरातच होते. सूत्रांनी...

ज्येष्ठ पौर्णिमा 2026: विष्णु-महालक्ष्मी अभिषेक, पितृपूजा

0
3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआज (२९ जून) ज्येष्ठ महिन्याची शेवटची तिथी म्हणजेच पौर्णिमा आहे. या वेळी अधिकमासामुळे ज्येष्ठ महिना ५९ दिवसांचा होता. याच पौर्णिमेला...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

दिव्य मराठी मुलाखत‎:पिण्याच्या पाण्याचा मुद्दा संवेदनशीलपणे हाताळणार, जिल्हा परिषद सीईओ अनय नावंदर यांची ग्वाही

0
जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नव्याने रुजू झालेले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर यांनी "दिव्य मराठी’शी संवाद साधला. शिक्षकांच्या प्रशिक्षणासह अन्य माध्यमांतून...
spot_img

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...
error: Content is protected !!