ग्रॅह गोचर 2025: १२ मे २०२५ पासून नवीन आठवडा सुरू होत आहे आणि हा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात एक नाही तर चक्क चार ग्रह आपली राशी परिवर्तन करणार आहे. वैदिक पंचागनुसार, या आठवड्यात १४ मे रोजी गुरू मिथुन राशीमध्ये गोचर करणार आहे आणि १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये गोचर करणार आहे. राहु आणि केतुचे गोचर कुंभ आणि सिंह राशीमध्ये होईल.
अशात या ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे सर्व १२ राशींवर प्रभाव दिसून येईल पण ३ राशींच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकते. जाणून घेऊ या त्या कोणत्या राशी आहेत?
मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी हा आठव़ा नवी आशा घेऊन शकते. १४ मे रोजी गुरू मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये गोचर करत असल्याने करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. या वेळी या लोकांचा आत्मविश्वासात जबरदस्त वृद्धी होऊ शकते. हे लोक आत्मविश्वासाने आणि स्पष्टपणे आपले मत इतरांसमोर मांडू शकतात.
या दरम्यान सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रमोशन तसेच मनाप्रमाणे नोकरी मिळू शकते. या लोकांचे उच्च अधिकार्यांबरोबर चांगले संबंध जुळतील ज्यामुळे भविष्यात त्यांना यशाचा मार्ग मिळण्यास सोपी जाईल. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुभ समाचार किंवा मोठी संधी मिळू शकते.
लिओ राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूचे गोचर विशेष लाभदायक ठरू शकतात. सूर्य सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे आणि सूर्याचे वृषभ राशीमध्ये गोचर नवीन योजना निर्माण करू शकतात. करिअर आणि व्यवसायात नवी शक्यता निर्माण करू शकतात. तसेच अडकलेली कामे मार्गी लागू शकतात.
केतुचे सिंह राशीमध्ये गोचर झाल्याने सिंह राशीचे लोक अध्यात्माकडे वळतील ज्यामुळे मानसिक शांतीचा अनुभव मिळेल. या लोकांचे जुने मित्र किंवा ओळखीची माणसं या राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतात. आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल.
धनु राशी
धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनाच्या काही क्षेत्रांमध्ये बदल आणू शकतात. या राशीचा स्वामी गुरूच्या राशी परिवर्तनासह सूर्य आणि राहु केतु या लोकांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणणार. या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. जुन्या कर्जापासून दिलासा मिळू शकतो. कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात.
या राशीचे लोक जर नोकरी शोधत असेल तर त्यांना रोजगाराची संधी मिळू शकते. सरकारी क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ही वेळ उत्तम राहीन. कौटुंबिक जीवनात शांती व समृद्धी नांदेल. आई वडिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसून येईल. जे लोक खेळ किंवा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आहेत, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम आहे. याशिवाय धार्मिक यात्रेचे योग जुळून येतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)






























