Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर ठरवून विशिष्ट कृती आराखडा तयार करा: निपुण महाराष्ट्र अभियान; केंद्र...

विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर ठरवून विशिष्ट कृती आराखडा तयार करा: निपुण महाराष्ट्र अभियान; केंद्र शिक्षण परिषदेत निवास चव्हाण यांचे आवाहन‎ – Akola News

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेने इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतांचे स्तर निश्चित करून, “विद्यार्थी विशिष्ट कृती आराखडा” तयार करणे आवश्यक आहे’असे मत आलेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख निवास चव्हाण यांनी येथे केले. १९ एप्रिलला आलेगाव येथील जिल्हा परिषद व प्राथमिक उर्दू शाळेत झालेल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते.

प्राथमिक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी त्यांचा सध्याचा अध्ययन स्तर निश्चित करून आराखडा तयार करताना मुलांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञान या क्षेत्रातील प्रगतीसाठी वैयक्तिक तंत्रांचा वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन व गणितीय कौशल्य यामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या विविध उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली. यावेळी चव्हाण यांनी शिक्षणाच्या गुणवत्तात्मक विकासासाठी शाळा, शिक्षक, पालक आणि समाज यांचा संयुक्त सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. विषयसाधन व्यक्ती नितीन गुल्हाने यांनी ५ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे उलगडून सांगितले. त्यांनी निपुण भारत अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती दिली आणि ३० जून पर्यंत ७५ टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित स्तर प्राप्त करावा, यासाठी ठोस उपाय सांगितले. विशेषतः “चावडी वाचन व गणन’ या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, सुधारित अभ्यासपद्धती, सुटीतील सराव उपक्रम, डिजिटल साधनसामग्री, ‘व्हीएसके’ प्रणालीवरील नोंदणी, आणि समाज सहभाग यासारख्या बाबींचाही परिषदेतील चर्चेत समावेश झाला.

या परिषदेस आलेगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक हरीश इंगळे, दत्तात्रय राऊत, संतोष खडसे, रमेश खर्डे, वसंत राठोड, शुभांगी वाघमारे, लक्ष्मी तायडे, अर्चना चव्हाण, चंदा राठोड, स्वाती राखोंडे, गणेश डाखोरे, आमिर खान आणि हरिदास लठाल यांचा उपस्थितीत सक्रिय सहभाग लाभला. कार्यक्रमासाठी आलेगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मो. अली अ. अजीज व त्यांच्या टीमचे योगदान उल्लेखनीय ठरले.

शासन निर्णयानुसार, प्रत्येक शाळेत १५ दिवसांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या उच्च स्तरावर प्रगती झालेल्या विद्यार्थ्यांची चावडी वाचन व गणन सत्र आयोजित करावीत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान विस्तारण्याची संधी मिळते. या सत्रात विद्यार्थ्यांना वाचन, गणन, शैक्षणिक क्रियाकलापांत प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन दिले जाते. यामुळे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढते, विद्यार्थ्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरणा मिळते. या सत्रांनी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासातही वृद्धी होते.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम

0
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...

17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...

0
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती‎

0
शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट...
spot_img

इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...

0
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...
error: Content is protected !!