शहरातील प्रमुख व्यापारी व रहदारीचा केंद्रबिंदू असलेल्या पेट्रोलपंप चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक पानटपऱ्या अचानक बंद दिसून येत असल्याने सध्या शहरात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नेहमी दिवसभर गजबजलेल्या या चौकातील काही पानटपऱ्या आज सकाळपासूनच पूर्णपणे बंद आढळल्याने, संबंधित व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व इतर आरोग्यास घातक असणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीवर प्रशासनाने आता आपले लक्ष केंद्रित केले आहे. संभाव्य कडक कारवाई, मोठी दंडात्मक कारवाई, तसेच दुकानांचे परवाने आणि नियमांची होणारी कडक तपासणी या पार्श्वभूमीवर अनेक पानटपरी चालक कमालीचे सावध झाले आहेत. प्रशासकीय कारवाईचा थेट फटका बसू नये, म्हणूनच अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवणे पसंत केल्याचे बोलले जात आहे.पेट्रोलपंप चौक हा शहरातील मुख्य मार्ग आणि गर्दीचे ठिकाण असल्याने या भागात पानटपऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अचानक एकाच वेळी अनेक दुकाने बंद झाल्यामुळे हा परिसर रिकामा रिकामा वाटत असून, हे चित्र येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेत प्रकर्षाने भरत आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात अद्याप प्रशासनाकडून कोणतीही मोठी किंवा थेट कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, केवळ प्रशासनाच्या आगामी हालचालींची आणि छाप्यांची कुणकुण लागताच पानटपरी व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.आता या सर्व परिस्थितीवर “खाकीचा धाक की प्रशासनाची आगामी मोठी कारवाई असा प्रश्न उपस्थित केला.
Source link
तिवसा शहरात चर्चांना उधाण; पानटपऱ्या झाल्या अचानक बंद:तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीमुळे भिती
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
भारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम
मराठी बातम्याराष्ट्रीयभारत बातम्या: लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्र चाचणी आणि खोकला सिरप नियम | जून 17 अद्यतने25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या...
17 जूनचे राशीभविष्य:सिंह, मीन राशीच्या लोकांना पदोन्नतीची संधी; कर्क, मकर राशीच्या लोकांना अडकलेले पैसे...
बुधवार, 17 जून रोजी कर्क राशीच्या लोकांना बऱ्याच काळापासून थांबलेली देयके मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांना व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि...
इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...
गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...
इंग्लंडचा 2018 च्या उपांत्य फेरीत हरवणाऱ्या क्रोएशियाशी सामना:कोलंबियापुढे उझबेकिस्तानचे फिफा विश्वचषक पदार्पण; फुटबॉलमध्ये प्रथमच...
फिफा विश्वचषकात आज रात्री इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात हाय-व्होल्टेज सामना खेळला जाईल. हा सामना जिंकून इंग्लंडला 2018 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवाचा...
इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...
सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....
सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...






























