Homeमहाराष्ट्रगिरीश महाजन यांच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषाच

गिरीश महाजन यांच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषाच

महाराष्ट्र (जळगाव) : राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर मनसे, शिवसेना (उध्दव ठाकरे), काँग्रेस यांच्यासह इतर काही पक्षांनी टीका केली असताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे प्रत्येक भारतीयाने ती शिकलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

येथे पत्रकारांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते. परंतु, हिंदी भाषा ही प्रत्येक भारतीयाने शिकली पाहिजे. ती संवादासाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी आणि विविधतेतील ऐक्य जपण्यासाठी महत्त्वाची भाषा आहे. ज्या देशात आपण राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. त्यामुळे ती येणे आपल्याला गरजेचे आहे. महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीच आहे आणि तिचे स्थान अढळ राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर विरोधकांकडून टीका होत असताना मंत्री महाजन यांनी सरकारची बाजू घेत आर्थिक व्यवस्थापन चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला. राज्य सरकारचे आर्थिक नियोजन बिघडल्याचे अजिबात वाटत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सध्या चांगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीसा निधी मागे-पुढे झाला असला, तरी इतर अनेक खात्यांमध्ये योग्य नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून मागील सर्व अनुशेष भरून काढला आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे देखील महाजन यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे सादर केलेले भाषण म्हणजे उद्धव ठाकरे गटाने सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. उद्धव ठाकरे यांचा टीआरपी आता संपलेला आहे. त्यांच्याबरोबर कोणी उरलेले नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे केविलवाणे प्रयोग करत आहेत, अशीही टीका महाजन यांनी केली. सौ.लोकसत्ता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!