Homeपुणे / पिंपरी-चिंचवड“योगोपचार” शिबिराला बालेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद; ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

“योगोपचार” शिबिराला बालेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद; ७०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

पुणे (बालेवाडी) : बालेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय “योगोपचार” आरोग्य शिबिराला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या पुढाकाराने लहू बालवडकर सोशल वेलफेअर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर आणि गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या दरम्यान दररोज सुमारे २०० ते २५० नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे एकूणच ७०० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. योगगुरु व योगोपचार तज्ज्ञ राम खांडवे गुरुजी यांनी शिबिराचे नेतृत्व केले, तर डॉ. श्री. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

पाठीच्या मणक्याचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांवर योगाच्या माध्यमातून उपचार पद्धती आणि जीवनशैलीतील बदल यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी नागरिकांनी उपचारानंतरच्या अनुभवांबाबत समाधान व्यक्त करत आयोजकांचे मन:पूर्वक आभार मानले.

शिबिरासाठी कोणतेही शुल्क न आकारल्यामुळे विविध वयोगटातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेषतः युवक, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला.

या उपक्रमामागे लहू गजानन बालवडकर व योगतज्ञ प्रमोद जोशी यांचे विशेष योगदान असून, “आरोग्यासाठी योग ही काळाची गरज आहे. पुढील काळात अशाच उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल,” अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

यूएस मध्यमवर्गीय उत्पन्न स्थिरता; AI प्रभाव वाढत आहे

0
केटी रॉजर्स.न्यू यॉर्क टाईम्स33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकन अर्थव्यवस्था सध्या एका विरोधाभासातून जात आहे, जिथे एका बाजूला अब्जाधीशांची संपत्ती नवीन उंची गाठत आहे, तर...
spot_img

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील...

0
टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया...
error: Content is protected !!