कर्नाटकच्या युवतीने रविवारी टापरगाव येथे केला मुक्काम
?
महिलांवरील अत्याचार आणि वाढत्याभ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठीकर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातीललिंगसुगूर तालुक्यातील बेंदोनी गावची ३०वर्षीय युवती मंजुला मेगीमुखा हिने थेटदिल्लीकडे आपली पायी वारी सुरू केलीआहे. २५ मार्चपासून तिने ही पायी यात्रासुरू केली असून आतापर्यंत ६५० किमीअंतर पार केले आहे. रविवार ( १३ एप्रिल)तिने टापरगाव येथे सायंकाळी मंदिरावरमुक्कामी थांबणार होती. परंतू हतनूर येथीलअमोल बिरुटे हे तेथून जात असतानाविचारपूस केली असता तिने अत्याचार वभ्रष्टाचाराविरोधात दिल्ली येथे पंतप्रधानमोदी यांना भेटून निवेदन देण्यासाठी पायीजात असल्याचे सांगितले. यावरून बिरुटेकुटुंबीयांनी तिला घरी आणून जेवण वरात्रभर राहण्याची सोय केली. रविवारीसकाळीच बिरुटे कुटुंबीयांनी मंजुला हिचेशाल-श्रीफळ देऊन पुढील वाटचालीसशुभेच्छा दिल्या व पुन्हा मंजुला मेगीमुखा हीयुवती मार्गस्थ झाली.
महिलांवरील अत्याचार आणिभ्रष्टाचाराविरोधात या युवतीने २५मार्चपासून दिल्लीकडे पायी वारी सुरूकेलेली असून दररोज ही युवती सुमारे ३०ते ५० किलोमीटर पायी अंतर पार करतआहे. आतापर्यंत तिने १९ दिवसांचा प्रवासकेला असून पुढे चाळीसगाव, धुळेयामार्गे प्रवास राहणार आहे. दैनंदिन सुरूअसलेल्या प्रवासात ही युवती विविधगावांमध्ये थांबून महिला व नागरिकांशीसुसंवाद साधत आहे. तिने सुरू केलेल्याआपल्या लढ्याचे महत्त्व सांगत असूनया लढ्याला जनतेतून मोठा पाठिंबातिला मिळत आहे.
आता समाजसेवेचा निर्णय
आपल्या नात्यातील पुरुषदेखील खूप भयंकरअसतात. माझ्या पतीने माझ्या आईसोबत गैरवर्तनकेले. त्यामुळे माझ्या आईने फाशी घेऊनआत्महत्या केली. मी पोलिसांत गेले असता माझीतक्रारदेखील दाखल केली गेली नाही. मग मीपतीपासून विभक्त होऊन समाजसेवा करण्याचानिर्णय घेतला आहे.
– मंजुला मॅगीमखा
महाराष्ट्रात आदराची वागणूक
दररोज ३० ते ५० किमीपर्यंत चालत आहे.आतापर्यंत वीस दिवसांत ६४० किमी प्रवास केलाआहे. कर्नाटकात मला काही ठिकाणीमद्यपींकडून त्रास झाला. परंतु महाराष्ट्रात बऱ्याचठिकाणी खूप आदराने वागणूक मिळाली. अनेककुटुंबांनी मला राहायची व जेवणाचीव्यवस्थादेखील करून दिल्याचे तिने सांगितले. कर्नाटकमधील मंजुला मेगीमुखा या तरूणीला हतनूर येथील ग्रामस्थांनी पुढील पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
































