Homeमहाराष्ट्रमुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि ‘व्हीआयपी’ समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आह

.

प्राथमिक माहितीनुसार, या जवानाने ड्युटीवर असताना स्वतःच्याच ‘सर्व्हिस रायफल’मधून गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी या जवानाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या नैराश्यातून किंवा कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पोलिस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

‘SRPF ग्रुप 16, कोल्हापूर’ तुकडीचे जवान होते

राजभवनात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) जवानाचे नाव कौस्तुभ सांगळे असे असून, ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. सांगळे हे मूळचे ‘एसआरपीएफ ग्रुप 16, कोल्हापूर’ येथील तुकडीचे जवान होते आणि सध्या त्यांची विशेष नियुक्ती मुंबईतील राजभवनाच्या सुरक्षेसाठी करण्यात आली होती. आज ते राजभवन परिसरातील ‘लोक भवन’ येथे आपल्या गार्ड ड्युटीवर तैनात होते.

गार्ड ड्युटी बजावत असतानाच अचानक त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या गोळीबाराचा प्रचंड आवाज ऐकताच परिसरातील इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कौस्तुभ सांगळे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अनपेक्षित आणि धक्कादायक घटनेमुळे अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात मोठी खळबळ उडाली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच मलबार हिल पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ राजभवनात दाखल झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करून जवानाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

एसआरपीएफ जवान कौस्तुभ सांगळे यांनी कौटुंबिक वादातून, नैराश्यातून की अन्य कोणत्या मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलिसांकडून सध्या कसून तपास केला जात आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कोणतीही ‘सुसाईड नोट’ अद्याप हाती लागलेली नाही. या प्रकरणाच्या अधिक सखोल चौकशीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी राजभवनात तैनात असलेल्या इतर सहकाऱ्यांचे आणि जवानांचे जबाब नोंदवून घेत असून, मलबार हिल पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

0
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना  ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’       पुणे / सातारा :...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, तर वृश्चिक, मकर राशीच्यांना बढती-नवीन जबाबदारीचे योग

0
बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि नवीन नोकरीचे...

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...
spot_img

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
error: Content is protected !!