Homeदेश-विदेशट्रेंडिंग न्यूज Google कर्मचार्‍यांना येथे काहीही न केल्याबद्दल पैसे देत आहे का...

ट्रेंडिंग न्यूज Google कर्मचार्‍यांना येथे काहीही न केल्याबद्दल पैसे देत आहे का हे माहित आहे

Google जॉब ट्रेंडिंग बातम्या: दर दिवशी, क्षणाक्षणाला असंख्य मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याच्या बळावर, आपल्या शिक्षणाला, कौशल्याला आणि प्रामाणिकपणाला न्याय देईल अशा नोकरीच्या शोधात असतात. मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या एक  ना अनेक संधी आणि तितक्याच बहुविध क्षेत्रात करिअर करण्याच्या नव्या वाटा तयार झाल्या आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची यामध्ये सरशी पाहायला मिळत आहे. त्यातच झालेली क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअर इंटेलिजेन्स (AI).

Google कडूनही AI चा सर्वतोपरी वापर केला जात असून, त्याचे नवनवीन वर्जन लाँच केले जात आहेत. अनेक ठिकाणी मानवी योगदानाची जागा या एआयनं घेतली आहे. याच वाटचालीमध्ये Google नं थक्क करणारं आणखी एक पाऊल उचललं आहे. सध्या गुगल कर्मचाऱ्यांना कोणतंही काम न करण्याचं काम देत आहे. आश्चर्य वाटत आहे ना? इथं कंपनीला एक सामंजस्य करार अपेक्षित आहे.

कामच करायचं नाही, हेच तुमचं काम….

Google ही कंपनी सोडल्यानतंर कर्मचाऱ्यांनी एका निश्चिर काळासाठी त्यांच्याशी थेट स्पर्धेत असणाऱ्या कोणत्याही कंपनीमध्ये काम न करणं अशी कंपनीची अपेक्षा आहे. या प्रक्रियेत एका कराराअंतर्गत कर्मचाऱ्यांना रितसर पगार मोजला जाईल, पण असं करत असताना मात्र या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याची परवानगी मात्र नसेल. काही प्रकरणांमध्ये हा काळ वर्षभराचाही असू शकतो.

काम न करता पैसे मिळणं हे अनेकांचच स्वप्न असलं, एक कल्पना असली तरीही प्रत्यक्षात असं होणं AI संशोधकांच्या करिअरवर परिणाम करणारं पाऊल ठरत आहे. मायक्रोसॉफ्टच्या AI चे उपाध्यक्ष आणि डीपमाईंडचे माजी कर्मचारी नांडो डी फ्रीटास यांनी X च्या माध्यमातून हा मुद्दा उजेडात आणत अनेकदा कर्मचारी आपल्याशी संपर्क साधून या परिस्थितीत नेमकं काय करणं अपेक्षित आहे, गुगलचे हे करार नेमके कसे नाकारायचे, इथपासून त्यांच्याकडे नोकरीच्या काही संधी आहेत का? इथपर्यंतचे प्रश्नही विचारतात. करिअरमध्ये न थांबता पुढे जाण्यासाठीचा हाच मार्ग अनेकजण सध्या निवडताना दिसत आहेत.

अनेकदा बहुतांश संस्था नोकरकपात किंवा तत्सम निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांकडून Contract वर सही करून घेतता. यामध्ये बऱ्याच छुप्या अटींचीसुद्धा नोंद केलेली असते. त्यामुळं नोकरी स्वीकारताना ज्याप्रमाणं कर्मचारी सतर्क असतात त्याचप्रमाणं नोकरी सोडतानासुद्धा त्यांनी सतर्क राहणं अपेक्षित आहे. अन्यथा करारबद्ध झाल्यास करिअरच्या वाटेत अडचणी आल्याच म्हणून समजा. (सौ.झीन्यूज)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

राज्यात अतिवृष्टीने 9 बळी:मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 5 चिमुकल्यांसह 6 जणांचा अंत; पावसामुळे जनजीवन विस्कळीत

0
मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत घरांमध्ये...

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट:उष्णतेमुळे 11 लाख कोटींचे नुकसान, पुढील वर्षी 34% लोकसंख्या...

0
युरोपमध्ये या वर्षीच्या उष्णतेचा लोकांच्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर, दोन्हीवर थेट परिणाम झाला. युरोपमधील 23 देशांमध्ये विक्रमी उष्णतेची लाट नोंदवली गेली. अनेक भागांमध्ये तापमान...
spot_img

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...
error: Content is protected !!