दुर्मिळ पृथ्वी घटक म्हणजे काय: भारताला सुपर जॅकपॉट लागला आहे. भारतात 70 लाख टनाचा दुर्मिळ धातूंचा महाखजिना सापडला आहे. या खजिन्यामुळे चीनची दुर्मिळ धातूच्या उत्पादन क्षेत्रातील दादागिरी संपणार आहे. भारतात आयफोनचे उत्पादन थांबवण्याचा प्रयत्न करणारा चीन आता आपल्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही, कारण भारतातच दुर्मिळ धातूचे उत्पादन सापडणार आहे.
सरकारने स्वतः संसदेत ही माहिती दिली. पृथ्वीवरीव दुर्मिळ धातूच्या (REEs) क्षेत्रात भारताला मोठे यश मिळाले आहे. कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी संसदेत ही माहिती दिली. देशात ऊर्जा राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंगरौली कोळसा क्षेत्रात दुर्मिळ खनिजांचा मोठा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे ही चांगली बातमी अशा वेळी आली आहे जेव्हा चीनने दुर्मिळ पृथ्वी धातूच्या निर्यातीवर बंदी घालून भारतातील अनेक उद्योगांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला होता. सिंगरौली कोळसा क्षेत्रात कोळसा आणि कोळसा नसलेल्या नमुन्यांमध्ये 250 पीपीएम आणि 400 पीपीएम आरईई आढळल्याची बातमी आली आहे.
भारतात दुर्मिळ धातूते साठे शोधणे हे जॅकपॉटपेक्षा कमी नाही, कारण या धातूवर चीनची मक्तेदारी आहे. भारतात सापडलेल्या या साठ्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक्स, वाहतूक आणि हरित ऊर्जा उद्योगांचे दुर्मिळ पृथ्वीसाठी चीनवरील अवलंबित्व संपेल. भारत हरित ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. या शोधामुळे भारताचे चीनवरील अवलंबित्व कमी होईल. स्मार्टफोनपासून ते इलेक्ट्रिक वाहने, लढाऊ विमाने, उपग्रहांपर्यंत, आज प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानात याची आवश्यकता आहे. स्वच्छ ऊर्जा, संरक्षण तंत्रज्ञानात सर्वत्र याची आवश्यकता आहे, म्हणूनच प्रत्येक देश या खनिजाच्या शोधात आणि नियंत्रणात गुंतलेला आहे. भारताकडे याचा मोठा खजिना आहे.
फक्त सिंगरौलीच नाही तर भारतात दुर्मिळ धातूचे मोठे साठे आहेत. भारतात सुमारे 7.23 दशलक्ष टन दुर्मिळ पृथ्वी घटक ऑक्साईड (आरईओ) आढळले आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी दुर्मिळ पृथ्वी धातूंचे साठे आढळत आहेत. अहवालांवर विश्वास ठेवायचा झाला तर, सिंगरौलीच्या कोळसा क्षेत्रातून सापडणारे दुर्मिळ पृथ्वी धातू भारताला जागतिक दुर्मिळ धातुंच्याबाबतीत भारताला अधिक सामर्थ्यवान बनवणार आहे.
अनेक क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटरी, सौर पॅनेल, पवन टर्बाइन, मोबाईल फोन, लॅपटॉप, एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रे त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. चीन हा दुर्मिळ धातूचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. जगातील सुमारे 90% दुर्मिळ पृथ्वी धातूंचे (REEs) शुद्धीकरण आणि प्रक्रिया चीन नियंत्रित करते. परंतु त्याचे सर्वात मोठे आव्हान पुरवठा आहे. निर्यात बंदी, किंमतींमध्ये फेरफार किंवा भू-राजकीय तणाव यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
17 घटकांचा दुर्मिळ धातूमध्ये सामावेश होतो. यामध्ये सेरियम, डिस्प्रोसियम, एर्बियम, युरोपियम, गॅडोलिनियम, होल्मियम, लॅन्थॅनम, ल्युटेशियम, निओडायमियम, प्रासियोडायमियम, प्रोमेथियम, समारियम, स्कॅन्डियम, टर्बियम, थुलियम, यटरबियम आणि यट्रियम यांचा समावेश आहे. त्यांना दुर्मिळ पृथ्वी म्हणतात कारण त्यांच्या धातूंमधून ते काढणे आणि शुद्ध करणे खूप कठीण आहे. त्यांना पृथ्वीवरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते.






























