Homeमहाराष्ट्र25-Year-Old Youth Murder in Vasmat | 25 वर्षीय तरुणाचा शस्त्राचा वार करून...

25-Year-Old Youth Murder in Vasmat | 25 वर्षीय तरुणाचा शस्त्राचा वार करून खून: पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू, वसमत येथील घटना; खुनाचे कारण अस्पष्ट – Hingoli News

वसमत शहरालगत उघडी नदीजवळ एका झाडाखाली तरुणाचा शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना रविवारी ता. ११ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वसमत शहर पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळाला भेट दिली असून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. खूनाचे नेम

?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत उघडीनदी परिसरातील एका झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख हकीम, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या छातीवर, पाठीवर शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर तरुणाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह शहरपेठ भागातील विश्‍वनाथ राजेंद्र कदम (२४) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

दरम्यान, मयत विश्‍वनाथ हा आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्यानंतर त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले. मात्र त्या भागात पाऊस झाल्यामुळे श्‍वान पथक वसमत पोलिस ठाण्यात थांबले होते.

या प्रकरणात पोलिसांनी आता संशयितांची चौकशी सुरु केली असून यामध्ये एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. तर खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत विश्‍वनाथ याच्या पश्‍चात आई असल्याचे सूत्रांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!