वसमत शहरालगत उघडी नदीजवळ एका झाडाखाली तरुणाचा शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना रविवारी ता. ११ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. वसमत शहर पोलिस ठाण्याचे पथकाने घटनास्थळाला भेट दिली असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. खूनाचे नेम
?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगत उघडीनदी परिसरातील एका झाडाखाली एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी महाजन, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख हकीम, प्रशांत मुंढे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेहाच्या छातीवर, पाठीवर शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर तरुणाचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह शहरपेठ भागातील विश्वनाथ राजेंद्र कदम (२४) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
दरम्यान, मयत विश्वनाथ हा आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्यानंतर त्याचा खून झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र त्या भागात पाऊस झाल्यामुळे श्वान पथक वसमत पोलिस ठाण्यात थांबले होते.
या प्रकरणात पोलिसांनी आता संशयितांची चौकशी सुरु केली असून यामध्ये एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. तर खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत विश्वनाथ याच्या पश्चात आई असल्याचे सूत्रांनी सांगितले.






























