Homeमहाराष्ट्रPune Girl Pakistan Zindabad Slogan Supports Pakistan On Social Media | India...

Pune Girl Pakistan Zindabad Slogan Supports Pakistan On Social Media | India Pak Tension | India Pak War | Operation Sindoor | पुण्यात तरुणीकडून सोशल मीडियावर पाकचे समर्थन: पोस्टमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्याही दिल्या घोषणा? सकल हिंदू समाजाची कारवाईची मागणी – Pune News

भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. याच तणावादरम्यान पुण्यात एक तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट करत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सकल हिंदू समाजाने माहिती दिली असून संबं

?

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात शिकणाऱ्या एका महिलेने भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या शेवटी तिने पाकिस्तान जिंदाबाद असे देखील म्हटले. यासंदर्भात सकल हिंदू समाजाने सोशल मीडिया एक्सवर माहिती दिली. सदरील तरुणीची पोस्ट सकल हिंदू समाजाने एक्सवर शेअर केली होती. मात्र, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर या महिलेची पोस्ट डिलीट करण्यात आल्याचा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे.

तरुणीने केलेली कथित पोस्ट नेमकी काय?

भारतीय राजवटीने नुकतेच पाकिस्तानमधील 3 प्रमुख नागरी भागांवर बॉम्बफेक करून 2 आण्विक राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू केले आहे. हा हिंदुत्व-दहशतवाद इस्त्रायली प्लेबुकमधून बाहेर आला आहे. या प्रदेशात भारताच्या वसाहतवादामुळे भारत व्याप्त काश्मीरमध्ये स्वतःच्या अपयशासाठी पाकचा बळीचा बकरा करत आहे. भारताने दाखवलेला हा धर्मांध इस्लामोफोबिक दहशतवाद विचित्र आहे. पाकिस्तान झिंदाबाद. असे पुण्यातील तरुणीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तरुणीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियासुरु असून तपासात अधिक बाबी स्पष्ट होतील, अशी माहिती कोंढवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक पाटणकर यांनी दिली आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद’चे स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला बेदम चोप

दुसरीकडे, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात स्टेटस टाकणाऱ्या तरुणाला रत्नागिरीकरांनी यथेच्छ चोप दिला. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडवली असून, पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महम्मद बद्रुद्दीन परकार (वय 21, मुळ रा. केजीएम प्लाझा, गोवळकोट, चिपळूण, सध्या रा. महादेव नगर, रत्नागिरी) असे संशयित तरुणाचे नाव असून, त्याने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर “पाकिस्तान जिंदाबाद”, “मोदी किलर आहे”, “पाकिस्तानसाठी प्रार्थना करा” अशा आशयाचे स्टेटस ठेवून समाजात तणाव निर्माण केला. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

फेसबूकवरून वन्यजीव तस्करी?:अहवालात दावा- फेसबूक बनले अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार

0
जगभरात वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, फेसबूक अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ज्ञात...
spot_img

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...
error: Content is protected !!