Homeमहाराष्ट्रनागपूरमधील 230 उष्णता संबंधित रुग्ण

नागपूरमधील 230 उष्णता संबंधित रुग्ण


नागपूर: नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागात  तापमान वाढत आहे. त्यामुळे नागपुरात उन्हाशी संबंधित रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने महिन्याभरात नागपूर शहरात उन्हाशी संबंधित एकूण २३० रुग्ण नोंदवले असून त्यात एका उष्माघाताच्या रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान नागपुरातील उन्हाशी संबंधित आजाराच्या रुग्णाबाबत आपण जाणून घेऊ या. उन्हाळ्याच्या दिवसात राज्यातील सर्वाधिक तापमान राहणाऱ्या जिल्ह्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे यंदा एप्रिलपासूनच नागपुरात चांगलेच उन्ह तापू लागले आहे. नागपुरातील विविध भागात २२ एप्रिलपर्यंत नंदनवन, तहसील, लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत आठ अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णालयात पोहचण्यापूर्वी वा नंतर त्यांचा मृत्यू झाल्याने हे मृत्यू उष्माघाताचे असल्याचे संशय आहे.

दरम्यान शासकीय रुग्णालयांत या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालातूनच या मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. महापालिकेकडून मात्र नागपूर शहरात तीन संशयितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान प्रत्येक उन्हाळ्यात नागपूर शहरातील तापमान ४६ अंशांहून वर जाते. नागरिकांना प्रचंड मनस्ताप करावा लागतो. यंदाच्या उन्हाळ्यात तापमान ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहचले. त्यामुळे रुग्ण वाढले आहेत. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, शहरात ८ मेपर्यंत २३० रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी एक रुग्ण उष्माघाताचा आहे. ५२ रुग्ण उन्हामुळे पुरळ आलेले, ७२ रुग्ण उन्हामुळे स्नायूला त्रास झालेले, १०५ रुग्ण उन्हामुळे थकवा व इतर त्रास झालेले आहेत. रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता महापालिकेतील डॉक्टरांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान नागपूर महापालिकेकडून शहरातील सगळ्याच उद्यानांसह सार्वजनिक भागात विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या माध्यमातून पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली गेली आहे. शहरातील बऱ्याच चौकात हिरवे नेट बांधून नागरिकांना उन्हापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर शहरातील सगळ्याच महापालिका व मेडिकल, मेयोसह इतरही शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची सोय करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या रुग्णालयांत स्वतंत्र कोल्ड वार्डाची सोय आहे.

नागपुरात आढळलेल्या रुग्णांना त्रास काय?

नागपुरात नागरिकांना उष्णतेमुळे अशक्तपणा, नीट चालता न येणे, चक्कर येणे, भ्रमिष्टपणा येणे, कधीकधी झटका येणेसह इतरही काही त्रास जाणवत आहे. हे रुग्ण डॉक्टरांकडून उपचार घेत आहे.

रुग्णांची स्थिती…

– उष्माघात – १

– उष्णतेमुळे होणारे पुरळ -५२

– उष्णतेमुळे होणारे पेटके -७२

– उष्णतेमुळे होणारा थकवा -१०५



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

फेसबूकवरून वन्यजीव तस्करी?:अहवालात दावा- फेसबूक बनले अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार

0
जगभरात वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, फेसबूक अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ज्ञात...
spot_img

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...
error: Content is protected !!