Homeदेश-विदेशPowai kidnapped similar case World Most Brutal School Massacre Beslan Horror 2004...

Powai kidnapped similar case World Most Brutal School Massacre Beslan Horror 2004 Remembered | मुलींवर अत्याचार, तहानलेल्या मुलांना टॉयलेटचं पाणी…330 मृत्यू, 2004 साली जगात घडलं होतं सर्वात क्रूर हत्याकांड


मुंबई मुले बंधक: मुंबईच्या पवई भागात 17 निरागस मुलांना बंधक बनवण्याच्या प्रकरणाने देशासह संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. एका स्टुडिओमध्ये ऑडिशनसाठी गेलेली ही मुलं अचानक बेपत्ता झाली आणि काही वेळातच एका व्यक्तीचा व्हिडीओ समोर आला  ज्यामध्ये त्याने स्वतः या मुलांना बंधक ठेवल्याची कबुली दिली होती. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात यश आलं, मात्र या घटनेने 21 वर्षांपूर्वी घडलेल्या जगातील सर्वात भीषण बेसलान स्कूल नरसंहाराची आठवण जागी केली आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

2004 चा बेसलान नरसंहार

3 सप्टेंबर 2004, रशियातील बेसलान शहर. त्या दिवशी शाळेच्या पहिल्याच दिवशी शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात होते. पण काही क्षणांतच सगळं काही बदललं. सशस्त्र चेचेन दहशतवाद्यांनी शाळेत घुसून शेकडो मुलं, शिक्षक आणि पालकांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलं. तीन दिवस चाललेल्या या वेढ्यात 330 लोकांचा मृत्यू झाला, ज्यात सर्वाधिक बळी हे लहान मुलांचे होते. दहशतवाद्यांनी मुलांना आणि स्त्रियांना शाळेच्या स्पोर्ट्स हॉलमध्ये बंद केलं, आणि तिथेच बास्केटबॉल कोर्टाच्या छतावर स्फोटकं लावली होती. रशियन फौजेला मुलांमुळे आक्रमक कारवाई करता येत नव्हती.

हे ही वाचा: ‘असा माणूस हवा जो मला प्रेग्नेंट करेल… मी 25 लाख देणार’, आकर्षक ऑफर ऐकून पुण्यातील कंत्राटदार गेला अन्…

काय होती मागणी?

रशियन सरकारने नकार दिला, आणि तिसऱ्या दिवशी कमांडो ऑपरेशन सुरू झालं. गोळीबार, स्फोट आणि भीषण आगीमध्ये शेकडो निरपराधांचा बळी गेला.

निर्दयतेचा कळस

या नरसंहारादरम्यान दहशतवाद्यांनी अमानुषतेचा कळस गाठला होता. काही मुलींवर लैंगिक अत्याचार झाले, अनेक मुलं उपासमारी व तहानेने तडफडली. पाणी मागितल्यावर त्यांना टॉयलेटमधलं पाणी पिण्यास भाग पाडण्यात आलं. अनेकांच्या शरीरावर जखमा, गॅसचा परिणाम आणि स्फोटांमुळे मृत्यू झाला. ही घटना जगभरातील मानवतेच्या इतिहासातील सर्वात काळी घटना म्हणून नोंदली गेली.

हे ही वाचा: Biggest Housing Deal: मुंबई, दिल्ली नव्हे तर ‘या’ ठिकाणी झाली सर्वात मोठी हाऊसिंग डील! Per Sqft चा दर तब्बल 1.7 लाख!

चेचेन दहशतवादी कोण आहेत?

चेचेन्या हे रशियाच्या उत्तरेकडील छोटे क्षेत्र. 1864 मध्ये रशियाने ताबा मिळवला, पण चेचेन्याने कधीच रशियाचा भाग म्हणून स्वतःला मान्य केलं नाही. सुन्नी मुस्लिम बहुल हा प्रदेश सतत रशियन सेनेशी संघर्ष करत आला आहे. याच संघर्षातून निर्माण झाले दहशतवादी गट, ज्यांनी बेसलानमध्ये हे अमानवी कृत्य केलं.

हे ही वाचा: विजयच्या सभेतील मृताच्या पत्नीने परत केली 20 लाखांची मदत; म्हणाली, “मी अपेक्षा केली होती की…”

मुंबईतील घटना – पवईत 17 मुलं बंधक

मुंबईच्या पवईतील RA Studio मध्ये 17 मुलं ऑडिशनसाठी गेली होती. लंच ब्रेकनंतरही मुलं बाहेर आली नाहीत तेव्हा पालक चिंतेत पडले. याचवेळी रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने व्हिडीओ पाठवून सांगितलं की त्याने मुलांना बंधक ठेवलं आहे आणि मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तो स्टुडिओला आग लावेल. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व मुलांना सुखरूप वाचवण्यात आलं आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलं.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्राद्धविधीमुळे श्राद्धकर्ता आणि त्याचे पूर्वज यांना आध्यात्मिक लाभ होतो का ?

0
गोवा - पिढ्यानपिढ्या, पितृपक्ष हा पूर्वजांचे (पितरांचे) स्मरण करण्याचा आणि त्यांच्यासाठी श्राद्धविधी करण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. पूर्वजांच्या आध्यात्मिक कल्याणासाठी आणि सद्गतीसाठी केला जाणारा...

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...
spot_img

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
error: Content is protected !!