Homeदेश-विदेशभारतातील रिअल इस्टेट हॉटस्पॉट मुंबई बेंगळुरू पुणे नवीनतम अद्यतने बातम्या बिल्डर्स

भारतातील रिअल इस्टेट हॉटस्पॉट मुंबई बेंगळुरू पुणे नवीनतम अद्यतने बातम्या बिल्डर्स


रिअल इस्टेट बातम्या: गेल्या दोन दशकांचा आढावा घेतल्यास भारतामध्ये अनेक शहरं मेट्रो शहरं होण्याच्या दिशेनं पावलं उचलताना दिसली तर जी शहरं देशाच्या महानगरांच्या यादीत आहेत त्यांनी प्रगतीच्या वाटेवर आणखी पुढचे टप्पे गाठल्याचं पाहायला मिळालं. आता हीच शहरं, किंबहुना भारतात विकासाची एक नवी लाट येण्यास सज्ज असून पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये देशातील शहरांचा मोठा विकास होताना दिसत आहे. थोडक्यात ज्या शहरांची ओळख देशात सध्या लहान शहरं म्हणून आहे, त्याच शहरांचा कायापालट होणार आहे.

पसंतीचा स्रोत म्हणून Zee News जोडा

कोणती शहरं ठरु शकतात, ‘लंबी रेस का घोडा’

देशातील कैक मोठ्या विकासकांनी भविष्यातील संधी आणि देशाचा एकंदर होणारा विकास पाहता काही अशा शहरांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे जी पाहता, तिथं संधी मिळताच गुंतवणूक करणं सामान्यांसाठीसुद्धा एक मोठी आणि तितकाच नफा देणारी सुवर्णसंधी देऊन जाणार आहे. सहसा मोठ्या विकासक कंपन्या अशा ठिकाणी मोठे भूखंड खरेदी करतात जिथं येत्या काळात विमातळ, एक्स्प्रेस वे किंवा मेट्रो या आणि यासारखे विकासप्रकल्प साकारले जाण्याची अपेक्षा असते किंवा असे प्रकल्प प्रस्तावित असतात. अशाच एका विकासक कंपनीनं 2026 मधील लँड बँक आकडेवारीला खुलासा केला.

403 एकर इतका प्रचंड भूखंड आणि…

झी बिझनेसच्या वृत्तानुसार शोभा लिमिटेडच्या इन्वेस्टर प्रेझेंटेशननुसार कंपनीकडे 403 एकरची लँड बँक आहे. यामध्ये बंगळुरू येथील 205 एकर, तामिळनाडूतील राजधानी चेन्नई आणि कोईंबतूरमध्ये 77 एकर, गुरुग्राममध्ये 44 एकर, पुण्यात 34 एकर आणि ग्रेटर नोएडामध्ये 12 एकर लँड बँक आहे.

पुढची 5-10 वर्षे शहरं झपाट्यानं मोठी होणार…

विकासकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले भूखंड पाहता लँड बँक आणि बाह्य परिसरामधील सक्रियतेचे हे मोठे संकेत असून, पुढच्या किमान 5 ते 10 वर्षांमध्ये ही शहरं झपाट्यानं मोठी होण्याचेच हे संकेत आहेत. दिल्ली एनसीआर, पुणे, बंगळुरू आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये मुख्य शहरांबाहेर मोठ्या टाऊनशिपर आणि मिनी शहरं आकार घेतील.

घर खरेदीदारांना काय फायदा?

गुंतवणूकदारांना या ट्रेंडचा फायदा होणार असून, यामध्ये जिथं विकासकांकडून जमीन खरेदी केली जात आहे, तिथंच पुढे जाऊन सुनियोजित शहरं उभी राहणार आहेत. जिथं, शाळा, रुग्णालयं, श़ॉपिंग सेंटर आणि उत्तम दळवळणाच्या सुविधा असल्यानं ही शहरं आत्मनिर्भर असतील. ज्यामुळं येत्या काळात घर खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या मंडळींनी यामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं असेल. मुंबई, पुणं, बंगळुरूमध्ये मुख्य प्रवाहातील ठिकाणआंना वगळून आकार घेणाऱ्या टाऊनशीपचे दर भविष्यात गगनाला भिडण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

भारतातील कोणती शहरं पुढील 5-10 वर्षांत झपाट्याने विकसित होण्याची शक्यता आहे?
दिल्ली एनसीआर (गुरुग्राम, ग्रेटर नोएडा), पुणे, बंगळुरू आणि मुंबईसारख्या मुख्य शहरांबाहेरील परिसरांमध्ये मोठ्या टाऊनशिप आणि मिनी शहरांचा विकास होईल. याशिवाय, चेन्नई आणि कोयंबतूरसारख्या तामिळनाडूतील शहरांमध्येही झपाट्याने वाढ अपेक्षित आहे.

विकास कंपन्यांनी गुंतवणूक का केली?
विकासक कंपन्या विमानतळ, एक्सप्रेस वे किंवा मेट्रोसारख्या प्रस्तावित प्रकल्पांजवळील भूखंड खरेदी करतात, जिथे भविष्यात मोठा विकास होण्याची अपेक्षा असते. हे भूखंड खरेदी करून ते सुनियोजित टाऊनशिपमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे नफा आणि शहरांचा विकास दोन्ही होतात.

या विकासाचा घर खरेदीदारांना काय फायदा होईल?
या भागांत शाळा, रुग्णालये, शॉपिंग सेंटर आणि उत्तम वाहतूक सुविधांसह आत्मनिर्भर शहरं उदयास येतील. गुंतवणूकदारांना उच्च परतावा मिळेल, विशेषतः मुंबई, पुणे, बंगळुरूतील टाऊनशिपच्या दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. आता गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन नफा मिळू शकतो.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!