Homeमहाराष्ट्रकेतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन

लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या करण्यात आलेले प्रसिद्ध तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्या कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. केतनचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी संध्याकाळी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

.

मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल यांना कर्करोगाचे निदान झाले होते. नातवाच्या अचानक झालेल्या क्रूर हत्येमुळे अग्रवाल कुटुंब आधीच मानसिकदृष्ट्या खचले होते. या दुःखाच्या सावटातच देवीचंद यांची प्रकृती अधिकच खालावल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवीचंद अग्रवाल यांची अंतयात्रा उद्या सकाळी दहा वाजता बेलमोंडा, टॉवर २५ गुंजे या निवासस्थानापासून निघून निघणार असून, निगडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्याच आठवड्यात ‘कँडल मार्च’मध्ये सहभाग

नातवाच्या अमानुष हत्येने देवीचंद अग्रवाल यांना तीव्र धक्का बसला होता. कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करत असतानाही, गेल्या आठवड्यात केतनला न्याय मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कँडल मार्च’मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांचा भावनांचा बांध फुटला होता. रडत रडत त्यांनी सियाच्या कुटुंबावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.

“सिया गोयल हिच्या कुटुंबानेच तिच्यावर केतनसोबत लग्न करण्यासाठी मोठा दबाव टाकला होता,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला. “या लग्नाला आणि घडलेल्या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्वांचीच पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे.”माझ्या नातवाचा जीव घेणारे आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनाही न्यायालयाने थेट फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली होती.

केतनचे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत

तरुण उद्योजक केतन अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी पूर्वनियोजित कट रचून लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या केली होती. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. सध्या या प्रकरणातील दोन्ही मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांचा कसून तपास सुरू आहे.

गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी संपूर्ण राज्यातून होत असतानाच, अग्रवाल कुटुंबाने घरातील कर्ता तरुण आणि आता घरातील ज्येष्ठ आधारस्तंभ गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा…

सियाने मित्राला सांगितले होते – लग्न जे होणार नाही:स्नॅप चॅट समोर आले; केतनच्या हत्येच्या 24 दिवसांपूर्वी बोलणे झाले होते

पुणे येथील केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी मंगेतर सियाची स्नॅपचॅटवर एका मैत्रिणीसोबतची चॅटिंग व्हायरल होत आहे, ज्यात लिहिले आहे- हे लग्न होणार नाही. या ओळीमुळे केतन खून प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, पोलिस या चॅटची चौकशी करत आहेत. सविस्तर वाचा…

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, नार्कोटेस्टबाबत कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी दोन्ही आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तपास अधिकाऱ्यांनी तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती आणि न्यायालयाने ३ जुलैपर्यंत मुदतवाढ मंजूर केली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज दोन्ही आरोपींना दुपारी वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासातील नवीन धागेदोरे आणि मोबाईलमधील ‘सांकेतिक भाषेचा’ (कोडवर्ड) हवाला देत आणखी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायाधीश ए. एम. विभुते यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आणि दोन्ही आरोपींची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!