Homeमहाराष्ट्रवसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत...

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत. या ठिकाणी हळद पावडर व इतर साहित्य तयार करून विक्रीसाठी पाठविले जाते. शुक्रवारी ता. 3 दुपारच्या सूुमारास गोविंदा पासवान (45, रा. समस्तीपूर, बिहार) हे काम करीत होते. यावेळी हळदीवर पाणी टाकण्यासाठी त्यांनी विद्युतपंप सुरु केला होता. त्यानंतर विद्युतपंपाला लोखंडी पाईप जोडत असतांना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये ते पाईपला चिटकून काही क्षणातच बाजूला फेकल्या गेले. सदर प्रकार इतर मजूरांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदा यांना तातडीने उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या प्रकरणी मुकेश सदा यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 रात्री अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी मिरासे, विजय उपरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत गोविंदा यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह त्यांच्या मुळगावी पाठविण्यात आला आहे. मयत गोविंदा यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मिरासे पुढील तपास करीत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

महाभारत: कर्णाची शिकवण:यश फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने मिळाले, तर ते दीर्घकाळ सन्मान मिळवून देऊ...

0
महाभारतात अश्वसेन नावाच्या एका नागाची कथा आहे. खांडव वनात एकदा भयंकर अग्नितांडव झाले होते. या अग्नितांडवात जंगलातील बहुतेक जीवजंतू नष्ट झाले होते. त्याच...

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

आग्रा येथे पतीची हत्या करून बाथरूममध्ये पुरले:मिस्त्रीला बोलावून टाईल्स लावल्या, 45 दिवस लोकांना सांगत...

0
आग्रा येथे पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह घरातील बाथरूममध्येच पुरला. कोणालाही याची माहिती मिळू नये म्हणून बाथरूममध्ये फरशा बसवल्या. 45 दिवस तिने लोकांना...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेसाठी शनिवारी मतदान:12 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात, शुक्रवारी भेटीगाठींवर भर

0
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC) अत्यंत चुरशीची निवडणूक शनिवारी पार पडत आहे. जिल्ह्याच्या राजकीय आणि आर्थिक सत्ताकेंद्राचे महत्त्व असलेल्या या निवडणुकीत...
spot_img

मार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष

0
मराठी बातम्याखेळमार्कस विलिस विम्बल्डन कमबॅक: नैराश्य आणि आर्थिक संघर्ष | फेडरर्स कल्ट हिरोलंडन32 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराखेळाच्या जगात काही कथा इतक्या फिल्मी असतात की...

भारत वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर:कोल्सला पहिल्यांदा संधी, जोफ्रा आर्चरचे पुनरागमन; हॅरी ब्रूक कर्णधारपद...

0
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडने 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ससेक्सचा अष्टपैलू खेळाडू जेम्स कोल्सला पहिल्यांदाच वनडे संघात स्थान मिळाले...

सगळ्यांच्या ‘हो ला हो’ करतो:मी सगळ्यांना खूश करतो, माझे स्वतःचे असे व्यक्तिमत्व नाही, मला...

0
प्रश्न– मी २७ वर्षांचा आहे आणि गेल्या काही काळापासून एक विचित्र गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत असतो, तेव्हा एका...

कॉमेडियन म्हणाला- डॉक्टर बनून महिलांचे अवयव बघेन:पोलिसवाला बनायचं नाही, बाबू गप्पीने पोस्ट केला आक्षेपार्ह...

0
प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर बाबू गप्पी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यामध्ये ते महिलांबद्दल आक्षेपार्ह गोष्टी बोलत...
error: Content is protected !!