एअर इंडिया फ्लाइट क्रॅश: (Ahemadabad Plane Crash) अहमदाबाद विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरा बसला. एक प्रवासी वगळता या विमानातलं इतर कुणीही या अपघातातून बचावलं ही आणि या भीषण विमान दुर्घटनेचे पदसाद अमेरिकेपर्यंत उमटले. इतके, की आता कैक मृतकांच्या कुटुंबीयांना रतन टाटा यांचीच आठवण येत आहे.
विमान दुर्घटनेतील मृतकांचे कुटुंबीय काय म्हणताहेत?
Air India flight AI171 crash मध्ये प्राण गमावलेल्या 65 कुटुंबीयांच्या वतीनं मदतीच्या मागणीसाठी अमेरिकेत लढणाऱ्या वकील माईक अँड्र्यूज यांनी सध्या सुरू असणाऱ्या मदत निधीच्या संपूर्ण प्रक्रियेवर नाराजीचा तीव्र सूर आळवला. आता टाटा समुहाचे अध्यक्ष (Ratan Tata) रतन टाटा असते तर, ही इतकी मोठी प्रक्रियाच मुळात नसती आणि मृतकांच्या कुटुंबीयांना अपेक्षित मदत मिळाली असती असं ते स्पष्ट म्हणाले.
दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबांसाठी रतन टाटा यांचं असणंच मोठं दिलासादायक असतं असंही ते म्हणाले. ‘अमेरिकेतही रतन टाटा कोण होते हे ठाऊक आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतींपासबव ते त्यांची साधी राहणी आणि कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा स्वभाव या साऱ्याची आम्हालाही किमान कल्पना आहेच. त्यामुळं आज जर ते इथं असते तर मला नाही वाटत की विमानात प्रवास करणारे (मृत) प्रवासी, विमान कंपनीतील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही प्रक्रियेत अडकून पडले असते आणि त्यांना मदत निधीसाठी इतकी प्रतीक्षा करावी लागली असती’, असं ते म्हणाले.
मृतकांच्या कुटुंबीयांपैकी एका वृद्ध मातेचं उदाहरण यावेळी त्यांनी देत या विमान दुर्घटनेमध्ये मुलाचा मृत्यू झाल्यावर त्या आईला कोण मदत करणार? तिनं सर्वांच्या दयेवरच दिवस ढकलायचे… असं म्हणत आईच्या आजारपण आणि औषधपाण्यासाठी ती मुलावरच अवलंबून होती, मात्र आता तिला मदतीसाठी वाट पाहावी लागतेय तिनं काय करावं? असा सवाल अमेरिकेतील वकिलांनी उपस्थित केला.
एअर इंडिया आणि टाटा समुहाच्या वतीनं मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा करण्यात आली खरी, मात्र ही मदत त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचू न शकल्यान आता अनेकांनाच रतन टाटा आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचीच आठवण येत आहे.
FAQ
अहमदाबाद विमान दुर्घटना (AI171) कधी आणि कुठे घडली?
12 जून 2025 रोजी, एअर इंडिया फ्लाइट AI171, बोईंग 787-8 विमान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडन गॅटविक विमानतळाकडे जात असताना टेकऑफनंतर अवघ्या 32 सेकंदात क्रॅश झाले.
या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आणि कोण बचावले?
या दुर्घटनेत 260 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 241 प्रवासी आणि क्रू मेंबर्स आणि 19 जमिनीवरील व्यक्तींचा समावेश आहे. फक्त एक प्रवासी वाचला, जो पाच दिवस रुग्णालयात होता.
या विमान दुर्घटनेसाठी कोणाला जबाबदार धरले जात आहे?
एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक अहवालानुसार, टेकऑफनंतर काही सेकंदातच विमानाचे दोन्ही इंजिन अनपेक्षितपणे बंद झाले, ज्यामुळे थ्रस्ट कमी होऊन विमान खाली कोसळले.

































