Homeमहाराष्ट्रविद्यार्थ्यांची दिवसातून तीनवेळा हजेरी घेणार, गैरहजर असल्यास थेट पालकांना मेसेज येणार

विद्यार्थ्यांची दिवसातून तीनवेळा हजेरी घेणार, गैरहजर असल्यास थेट पालकांना मेसेज येणार


आज पुणे न्यूज: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाकडून तातडीने नव्या आदेशाची अंमलबजावणी राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील सुरक्षा व्यवस्था तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश आहे.

शालेय शिक्षण विभागाचे नवे आदेश काय?

दिवसभरात विद्याथ्यांची तीन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तत्काळ एसएमएस पाठवण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याऱ्यांसाठी चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसंच, विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये म्हणून समुपदेशक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थी अनुपस्थित असल्यास पालकांना लगेचच कळवले जाणार आहे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना दिवसातून तीन वेळा हजेरी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले असून यंदापासून सर्व शाळांमध्ये त्याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे. जर विद्यार्थी गैरहजर असेल तर त्याबाबतचा मेसेज पालकांना पाठवला जाणार आहे.

सीसीटीव्ही बंधनकारक

विद्यार्थ्यांची हालचाल लक्षात ठेवण्यासाठी शाळेच्या सर्व परिसरात सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे शाळेतील कोणताही अनुचित प्रकार टाळता येणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरा वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, प्रवेशद्वार, मैदाने तसेच स्वच्छतागृहांबाहेर लावणे बंधनकारण असणार आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा मागील एक महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक करताना पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तत्काळ समाप्त करणे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिसर, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी, असं नमूद करण्यात आले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!