Homeमहाराष्ट्रUnseasonal Rain : अवकाळीचा जोर शेतकऱ्यांच्या जिवाला घोर, अवकाळीनं शेतकरी देशोधडीला

Unseasonal Rain : अवकाळीचा जोर शेतकऱ्यांच्या जिवाला घोर, अवकाळीनं शेतकरी देशोधडीला


अनावश्यक पाऊस: महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. बीडमध्ये शेतकऱ्याचा कांदा पावसात भिजल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची काय अवस्था झाली आहे पाहुयात सविस्तर… ‘मी आता पुरती थकलेय नाही झेपत हो आता. नक्की आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय? हा चिखल बघा. तुम्हाला सांगायला मला शब्दही सुचत नाहीय. नोकरी

करणाऱ्याला महिन्याला सॅलरी मिळते. व्यवसाय करणाऱ्याला त्याचे दिवसाचे पैसे मिळतात. अचानक ते मिळणारच नाहीत असं झालं तर तुमची जी घालमेल होईल ना. तशीच कदाचित त्याहून जास्त घालमेल माझी झाली आहे. आम्ही बीडचे आष्टीच्या शिंदेवाडीतले तीन एकरात कांद्या लावला. चांगलं पीक यावं म्हणून पाच सहा महिने राब राब राबले. उन्हातान्हात शेतात कसले, पीक आलं, कांदा काढला, शेतात वाळवला आता बाजारात नेऊन विकायचा तेवढा शिल्लक होता. पण दृष्ट पावसानं घात केला. थोडा थोडका नाही हो 300 गोणी कांदा अवकाळीनं नासवला. सांगा ना आमची काय चूक.’

त्यानंतर याविषयी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘मरेस्तोर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची मेहनत अशीच मातीमोल होते. आम्ही करायचं तरी काय? शेवटी शेतकरी. उद्या नुकसान भरपाई मागितली तरी तुम्ही लोक कुजबुज करणार. आधीच काळजी घ्याची होती. कुठेतरी साठवायचा होता. अहो, शेतात न राबणाऱ्या लोकांना बोलणं सोपं आहे. शेत उघड्यावर आहे. कडाक्याच्या उन्हात अचानक अवकाळी पाऊस आला. जमेल तेवढा झाकला लगेच नेणार तरी कसं आणि साठवायचा तरी कुठे? शेतकरीच नाही तर त्याच्या कुटुंबाला हे भोग भोगावे लागतात. आता मायबाप सरकारलाच विनंती आहे, पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या. माझी चिमुकली पण मदतीला आली आहे. जून तोंडावर आलाय शाळा सुरू होणार फी कशी भरायची असा प्रश्न पडलाय. तीही बिचारी आमच्या बरोबर शेतात कांदे उचलते.’

हेही वाचा : पोटच्या बाळाला कुशीतही घेऊ शकत नाही अशी अवस्था, लोकप्रिय अभिनेत्रीला जडलाय दुर्मिळ आजार!

दुसरी शेतकरी महिला तिची व्यथा सांगत म्हणाली, ‘माझी पण तीच व्यथा हो. सोनाली ताईंचा कांदा होता माझी हळद होती इतकाच फरक. हिंगोलीत सेनगावाच्या नागा सिंदगीमध्ये माझ्या शेतात मी हळद लावली. अपेक्षेप्रमाणे उत्पादन आलं. हळद वाळत घातली पण नशीबच खराब. वादळी वाऱ्यासह पावसानं झोडलं. आता शेतात वाळलेल्या हळदीचा पिवळा चिखल झाला आहे. हातातलं पीक गेलं आहे. आर्थिक नुकसान झालं. तुम्हीच सांगा आता पुढची वाट काय. बी बियाणांचे भाव आणि खतांचे भाव वाढलेत. त्यासाठी साठवलेला पैसा खर्च केला. पिकं आलं की काढणीला मजुर लागतात, त्यांच्या मजुरीचा खर्चही केला. हळद वाळली की विकायची हा विचार सुरू असताना अवकाळीचा मारा झाला आणि पिकांचा चिखल.’





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मुंबई राजभवन SRPF जवानाची ड्युटीवर आत्महत्या; पोलीस तपास

0
मलबार हिल येथील अत्यंत सुरक्षित आणि 'व्हीआयपी' समजल्या जाणाऱ्या राजभवन परिसरात एक अत्यंत खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात...

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!