Homeमहाराष्ट्रसीसीटीव्हीने उघडकीस आणले की राजेंद्र हागावन वैष्णवी हागावणे यांच्या मृत्यूनंतर हॉटेलमध्ये मटण...

सीसीटीव्हीने उघडकीस आणले की राजेंद्र हागावन वैष्णवी हागावणे यांच्या मृत्यूनंतर हॉटेलमध्ये मटण खात होते


राजेंद्र हागावणे सीसीटीव्ही: जमीन खरेदीसाठी माहेरहून दोन कोटी रुपये आणावेत यासाठी सूनेचा मानसिक आणि शारिरीक छळ करुन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा राजेंद्र हगवणे याला अखेर अटक करण्यात आली आहे. सून वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी चार्जशीटमध्ये खूनाचा संशय व्यक्त केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवासांपासून फरार होते. आज पहाटे 4.30 वाजता दोघांना पोलिसांनी अटक केली.

सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांना आधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र आणि सुशील हगवणे याला अटक करण्यात आली. दरम्यान अटकेआधीचा राजेंद्र हगवणेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सूनेचा मृत्यू झालेला असताना सासरा मात्र मटणावर ताव मारत होता.

मटण सुक्का, तांबडा-पांढरा रस्सा, मटण रस्सा, भाकरी, बिर्याणी

16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. मात्र राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा याठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला. हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता.

परंतु 17 मे रोजी ज्या ठिकाणी हगवणे जेवायला बसला होता त्या रूमला आता बंद ठेवण्यात आलं आहे. ही रूम का बंद करण्यात आली आहे याचं उत्तर या हॉटेल मधील एकाही स्टाफकडे नाही. याशिवाय हगवणे याठिकाणी आला त्याविषयी माहिती देण्यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=ekft-ew8vuo

हॉटेल मालक मोहन भेगडे यांच्याशी झी 24 तासच्या प्रतिनिधीकडून फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आता या हॉटेल मालकाने देखील त्यांना या प्रकरणी मदत केली का असा सवाल उपस्थित होत आहे.

28 मेपर्यंत पोलीस कोठडी

अटक केल्यानंतर आज हगवणे बाप-लेकाला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी रिमांड कॉपीत हत्येचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!