नखे कापण्याचा शुभ दिवस कोणता?
धार्मिक आणि ज्योतिष शास्त्रात नखे कापण्यासाठी विशिष्ट दिवस आणि वेळेचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. योग्य दिवशी नखे कापल्यास जीवनात सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धी मिळते, तर अयोग्य दिवशी हे केल्यास नुकसान होऊ शकते.
नखे रात्री का कापू नयेत?
पूर्वीच्या पिढ्यांनी वारंवार सांगितले आहे की सूर्यास्तानंतर, म्हणजे रात्री किंवा या दिवशी नखे कापू नयेत. कारण यामुळे देवी लक्ष्मी नाराज होतात आणि दारिद्र्य येते. त्यामुळे नखे कापण्याची योग्य वेळ आणि दिवस जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आठवड्याच्या सातही दिवस नखे कापण्याचेही वेगवेगळे परिणाम होतात. तर जाणून घ्या नखे कापण्यासाठी सर्वात शुभ दिवस कोणता आहे.
आठवड्याच्या दिवसांनुसार नखे कापण्याचे परिणाम:
सोमवार
सोमवारी नखे कापणे शुभ मानले जाते. हा दिवस महादेव आणि चंद्राशी संबंधित असल्याने मन शांत राहते.
मंगळवार
मंगळवारी नखे कापणे टाळावे. मात्र काही लोकांच्या म्हणण्यानुसार यामुळे कर्जमुक्ती होते. हनुमानासाठी उपास करणाऱ्यांनी या दिवशी नखे कापणे टाळावे.
बुधवार
बुधवारी हा दिवस नखे कापण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यामुळे आर्थिक लाभ, करिअरमध्ये यश आणि व्यवसायात वाढ होते.
गुरुवारी
गुरुवारी काही मतांनुसार नखे कापू नयेत असे अनेकदा ऐकायला मिळते, पण यामुळे सत्त्वगुण वाढतो असेही मानले जाते.
हे ही वाचा: शनीच्या प्रभावापासून सुटका हवी आहे? ‘या’ 5 मंदिरांना भेट द्या अन् साडेसातीपासून मिळवा मुक्ती!
शुक्रवार
शुक्रवारी हा नखे कापण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. देवी लक्ष्मी प्रसन्न होते, संपत्ती आणि सौंदर्य वाढते, नातेसंबंध अधिक दृढ होतात.
शनिवार
शनिवारी नखे कापणे अशुभ मानले जाते. यामुळे शनीचा कोप होतो आणि आरोग्य, मन:शांती आणि आर्थिक नुकसान संभवते.
रविवारी
रविवारी नखे किंवा केस कापू नयेत. आत्मविश्वास कमी होतो, यशात अडथळे येतात आणि आरोग्य बिघडते.
योग्य दिवशी नखे कापल्यास केवळ आरोग्यच नव्हे तर आर्थिक आणि मानसिक फायदेही मिळू शकतात.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.)
































