Homeमहाराष्ट्रमाजी खासदार भास्कराव खतगावरकर यांनी पुढील वर्षी अजित पवार हे मुख्यमंत्री असतील...

माजी खासदार भास्कराव खतगावरकर यांनी पुढील वर्षी अजित पवार हे मुख्यमंत्री असतील असा अंदाज वर्तविला आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही तशी लपून राहिलेली नाही. अनेकदा त्यांनी याबद्दल जाहीरपणे भाष्य केलं आहे. मलाही अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री व्हावं असं वाटकत आहे, पण तसा योग येत नाही असं विधानही त्यांनी केलं होतं. त्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजित पवारांना नेहमीच मुख्यमंत्री व्हा अशी साद घालत तशी बॅनरबाजीही करत असतात. दरम्यान नुकतंच  माजी खासदार भास्करराव पाटील खातगावकर यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत केलं आहे. नांदेडमधील कार्यक्रमात ते बोलत होते.

नांदेडमधील कार्यक्रमात भाषण करताना भास्करराव खतगावरकर यांनी वर्तवलेल्या भाकिताने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. अजित पवार मुख्यमंत्री होतील असं भाकीत वर्तवताना त्यांनी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील असाही दावा केला.

भास्करराव पाटील खतगावकर नेमकं काय म्हणाले?

“दादा माझं भाकीत खरं होतं. मी अशोक चव्हाण यांना म्हटलं होतं तुम्ही मुख्यमंत्री व्हाल ते मुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये राजकीय चर्चा होते. तिथे अशी चर्चा आहे की येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल,” असं भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले आहेत. यादरम्यान त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडमध्ये सत्काराला यावं अशी विनंतीही केली.

यावेळी अजित पवारांचं कौतुक करत ते म्हणाले की, “राज्यातील धडाडीचं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. मी शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काम केलं आहे. पण तुमच्याइतकी ऊर्जा, प्रशासनावरील पकड, अभ्यास आणि 18 तास काम करण्याची शारिरीक क्षमता पाहिलेली नाही”.

पक्षप्रवेश सोहळा

नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शेषराव चव्हाण, मार्केट कमिटीचे माजी सभापती सुशांत राठोड, नांदेडचे माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, नांदेडचे माजी नगरसेवक उदय चव्हाण यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांवर चालणारा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असं अजित पवारांनी यावेळी आश्वस्त केलं. तसंच जिल्ह्यातील विकासकामांशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास व्यक्त केला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!