Homeमहाराष्ट्रभारत-पाकिस्तान युद्धाची परिस्थिती संपल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी...

भारत-पाकिस्तान युद्धाची परिस्थिती संपल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील


महाराष्ट्र राजकारण: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतावदी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’  सुरु केले आहे. भारत पाक यांच्यात युद्ध स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारत पाक युद्धजन्य परिस्थिती निवळ्यानंतर महाराष्ट्रात राजकारणात सर्वात मोठी घडामोड घडणार आहे.

युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे.  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उप मुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचे जाणवते. आता शरद पवारांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी ही माहिती दिली.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत. त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंदच आहे. ते एकत्र यावेत यासाठी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्यानंतर आता माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनीही तोच सूर आळवला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी ओझरती चर्चा झाली आहे. तसेच उप मुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या मतदारसंघातील कामा बाबत सकारात्मक आहेत. त्यांच्याकडून कोणतीही आड काठी होत नाही. ते सकारात्मक संकेत देत आहेत. तर आपणही तशी भूमिका घ्यावी असे आमच्या वरिष्ठांना सांगितले आहे. युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर कदाचित याबाबत आमदारांची बैठक होऊन याबाबत निर्णय होईल अशी माहिती आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादीत सध्या विलीनीकरणाचे वारे सुरु आहेत का ?…राष्ट्रवादी (SP) पक्षातील एक गट अजित पवारांसोबत जाणार का अशा चर्चा सुरु झाल्यात.. याला निमित्त ठरलंय शरद पवारांचं मोठं वक्तव्य… आमच्या पक्षातील एका गटाला अजित पवारांसोबत जावं वाटतंय असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत माहिती दिलीय… इंडिया आघाडीच्या सद्य स्थितीवरही पवारांनी भाष्य केलंय.. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय… पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे सुरु झालेत का अशा चर्चा रंगल्यात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...

पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार,...

0
ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!