Homeमहाराष्ट्रभारत पाकिस्तान युद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस यांनी संपूर्ण राज्यभरात सावध राहण्याचा...

भारत पाकिस्तान युद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस यांनी संपूर्ण राज्यभरात सावध राहण्याचा आणि सुरक्षा कडक करण्याचा इशारा दिला.


भारत पाकिस्तान युद्ध: भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील संपूर्ण सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.

मॉकड्रिल, ब्लॅकआऊट आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. या बैठकीसाठी प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निकषांवर मुख्यमंत्र्यांनी दृष्टीक्षेप टाकला. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा असा स्पष्ट इशारा त्यांनी गृह विभागाला दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे…

– प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.

– प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा.

– शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या

– एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या

– सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.

– ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.

– ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.

– केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.

– पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.

– सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.

– सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या

– नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

फेसबूकवरून वन्यजीव तस्करी?:अहवालात दावा- फेसबूक बनले अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार

0
जगभरात वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक गैर-सरकारी संस्थांच्या (NGO) एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, फेसबूक अवैध वन्यजीव तस्करीचे सर्वात मोठे ज्ञात...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ:मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ उपक्रम; नेमका उपक्रम काय?

0
आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे 'चरण सेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात...
spot_img

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...

पश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे...

0
मराठी बातम्याव्यवसायपश्चिम आशिया युद्ध आणि पुरवठा साखळी संकट भावना ओलावणे; टॉप 7 शहरांमध्ये 90,715 घरे विकली गेलीनवी दिल्ली6 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात एप्रिल-जून तिमाहीत...

बेन स्टोक्सची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती:2019 विश्वचषक, 2022 टी-20 वर्ल्डकपचा हिरो; नाइट क्लब वादामुळे कारकीर्द...

0
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेला तिसरा कसोटी सामना त्याचा शेवटचा सामना असेल. त्याच्या निवृत्तीची घोषणा...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...
error: Content is protected !!