Homeदेश-विदेशपाकिस्तानमध्ये लॉकडाउन? भारताकडून हल्ल्याच्या भीतीने मदरसे, हॉटेल आणि पर्यटकांसंदर्भात मोठा निर्णय

पाकिस्तानमध्ये लॉकडाउन? भारताकडून हल्ल्याच्या भीतीने मदरसे, हॉटेल आणि पर्यटकांसंदर्भात मोठा निर्णय


पाकिस्तान लॉकडाउन आणीबाणी : काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भयान शांतता पसरली आहे. भारताकडून पाकिस्तानवर संभाव लष्करी कारवाईची भीती असल्याने पाकिस्तानने  सुरक्षेच्या दृष्टीने पीओके प्रशासनाने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदन देताना असे संकेत दिले की, जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी जाहीर करण्यात येऊ शकते. या विधानानंतर संपूर्ण परिसरात अस्वस्थता आणि सतर्कता वाढली पाहिला मिळत आहे.

पाकिस्तानमध्ये पीओके सरकारने नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे. नीलम व्हॅली आणि लीपा व्हॅली सारख्या भागात कडक देखरेख वाढवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी मार्बल चेकपोस्टवरून अनेक पर्यटकांना परत पाठवले आहेत. तर स्थानिक रहिवाशांना नियंत्रण रेषेकडे जायला बंदी करण्यात आली आहे. तसंच, नागरिकांना सुरक्षा यंत्रणांना पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे, पीओके प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धार्मिक मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. भारत या मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून घोषित करून कारवाई करू शकतो अशी भीतीने पाकिस्तानने निर्णय घेतला आहे. पीओकेचे कायदा मंत्री मियां अब्दुल वाहिद यांनी भारतावर तीव्र हल्ला चढवत म्हटलं की, ते एका ‘धूर्त, निर्दयी आणि कट रचणाऱ्या’ शत्रूशी सामना करत आहेत आणि कोणत्याही प्राणघातक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

त्याच वेळी, भारताकडून संभाव्य आक्रमण झाल्यास सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने तयारी वाढवली आहे. पीओके सरकारने अन्न, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन निधीमध्ये 1 अब्ज रुपये हस्तांतरित केले आहेत. याशिवाय, हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि लग्नाच्या सभागृहांच्या मालकांनी सैन्याच्या समर्थनार्थ त्यांच्या आस्थापना तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्याच आवाहन केलं आहे.

त्याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाल्याचा पाहिला मिळत आहे. मे महिन्यात कराची आणि लाहोर हवाई क्षेत्रात दररोज आठ तासांसाठी (सकाळी 8 ते दुपारी 4) उड्डाणे बंद राहणार आहे. त्याचा परिणाम गिलगिट-बाल्टिस्तानपर्यंत पोहोचला आहे, जिथून इस्लामाबादला जाणारी उड्डाणे सलग दुसऱ्या दिवशी रद्द करावी लागली. गिलगिट आणि स्कार्दूला जाणाऱ्या विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. तसंच, इस्लामाबाद विमानतळावरील खराब हवामानामुळे, अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे एकतर उशिराने झाली किंवा इतर विमानतळांवर वळवण्यात आली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!