यूपीएससी टॉपर 2025: यंदा UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत 1009 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यात उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या शक्ती दुबे यांनी टॉप केलं आहे. त्यांना ऑल इंडिया रँक 1 मिळाली आहे. मात्र, त्यांच्या या यशावर सध्या काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशातील सीनियर आयपीएस राहिलेले यशोवर्धन झा आजाद यांनी एक पोस्ट शेअर करत शक्ती दुबेच्या टॉप करण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. चला तर जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण…
शक्ती दुबे कोण आहे?
शक्ती दुबे उत्तर प्रदेशच्या नैनी, प्रयागराज येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे प्रयागराजमध्येच झाले. त्यांनी इलाहाबाद विद्यापीठातून पदवी घेतली आणि नंतर वाराणसीतील बनारस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मधून मास्टर्स केलं. त्यानंतर शक्ती दुबे यांनी 2018 च्या सुमारास UPSC सिविल सर्विस परीक्षेची तयारी सुरू केली. यंदा या परिक्षेसाठी तब्बल 9 लाखांहून अधिक उमेदवार होते. त्यांच्यातून शक्ती दुबे यांनी पहिला रॅंक मिळवला आहे.
यूपीएससी परिक्षेसाठी घेतलेल्या या अटेम्पटवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. माजी आयपीएस अधिकारी आणि केंद्रीय सूचना यशोवर्धन झा आजाद यांनी नुकतीच 2024 यूपीएससी टॉपर शक्ती दुबे यांच्या 5 अटेम्प्टवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यात म्हटलं की शक्ती दुबे यांचं अभिनंदन आणि म्हणाले की उमेदवाराला वयाच्या 25 वर्षांच्या आधीच 2 वेळा अटेम्पट द्यायला नको होते. त्यासोबत त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चुकून शक्ती दुबेच्या जागी साक्षी दुबे लिहिलं आहे.
यूपीएससी निकालात प्रथम क्रमांकावर शिखा दुबे यांचे अभिनंदन. परंतु 5 प्रयत्न म्हणजे 6 वर्षांची कष्ट – कोचिंगमध्ये गेलेली तरुणांची सर्वोत्तम वर्षे? तेथे 5 लाख होते ज्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्न करत राहिले. आपण आपल्या मौल्यवान तरुणांना परीक्षेत वर्षे व वर्षे वाया घालवल्या पाहिजेत. या वर्षांमध्ये,…
— Yashovardhan Jha Azad (@yashoazad) 23 एप्रिल, 2025
हेही वाचा : भारत-पाकिस्तानमध्ये होतो 1000,00,00,000 चा ‘सीक्रेट व्यापार’; पहलगाम हल्ल्यानंतर…
यशोवर्धन झा आजाद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे दुबे यांनी स्वत: सहा वर्षात पाच अटेम्प्ट दिल्यानंतर पहिला रॅंक मिळवला आहे. दरम्यान, माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन झा आजाद हे 1976 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्या करिअरमध्ये ते महत्त्वाच्या पदावर राहिले आहेत. त्याशिवाय त्यांनी इंटेलिजेन्स ब्यूरोमध्ये देखील काम केलं आहे.






























