Homeदेश-विदेशजॉब न्यूज पीएचडी एमबीए कायदा राजस्थानमधील शिपाई नोकरीसाठी 24 लाख अर्जदारांमध्ये पदवीधर...

जॉब न्यूज पीएचडी एमबीए कायदा राजस्थानमधील शिपाई नोकरीसाठी 24 लाख अर्जदारांमध्ये पदवीधर आहे


जॉब न्यूज: देशातील बेरोजगारीचा प्रश्न वारंवार चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. खासगी नोकरीबरोबरच सरकारी नोकरी मिळावी म्हणूनही अनेकजण सतत प्रयत्नात असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा आणि मुलाखतींच्या माध्यमातून देशभरातील लाखो तरुण प्रचंड मेहनत घेतात. नोकरी कोणतीही असो पण सरकारी असली पाहिजे अशीही अनेकांची भूमिका असते. त्यामुळेच सरकारी नोकरीच्या जागा निघतात तेव्हा त्याचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. असाच काहीसा प्रकार सध्या राजस्थानमध्ये समोर आला आहे. राजस्थानमध्ये शिपाई पदासाठी 53 हजार 749 जणांची भरती होणार आहे. मात्र शिपाई होण्यासाठी तब्बल 24 लाख 76 हजार जणांनी अर्ज केला आहे. म्हणजेच एका पदासाठी 46 जणांमध्ये स्पर्धा असणार आहे.

वेबसाईट अनेक वेळा बंद

आश्चर्याची बाब म्हणजे अर्जदारांची शैक्षणिक पात्रता थक्क करणारी आहे. एमबीए, पीएचडीसारखं उच्च शिक्षण घेतलेल्यांनीही शिपाई होण्यासाठी अर्ज केला आहे. नागरी सेवांची परीक्षा देणाऱ्यांचाही अर्जदारांमध्ये समावेश आहे. यापैकी बरेचसे उमेदवार हे उच्चशिक्षित आहेत आणि याबरोबरच ते प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या इतकी असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळेच अर्जदारांची संख्या इतकी जास्त होती की त्याने एकंदरित भरती प्रक्रियेवर ताण आला. अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला, यामुळे वेबसाईट अनेक वेळा बंद पडल्याचं ‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

दर सहा सेकंदाला एकाचा अर्ज

अर्ज भरण्यासाठी अखेरचे पाच तास शिल्लक असताना तब्बल 1 लाख 11 हजार अर्ज दाखल करण्यात आले. आकडेमोड केली तर शेवटच्या पाच तासांमध्ये प्रत्येक सहा सेकंदाला एक अर्ज दाखल करण्यात आला. अनेक इच्छूक उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्याने तसेच बऱ्याच जणांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न करता आल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. यापूर्वीही अवघ्या 2 हजार 399 वनरक्षक पदांसाठी 22 लाख उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.

राजस्थानमध्ये 30 ते 35 लाख बेरोजगार

अधिकृत आकडेवारीनुसार राजस्थान राज्यामध्ये 18 लाख तरुणांनी बेरोजगार म्हणून स्वत:ची नोंदणी केली आहे. नोंदणी न केलेल्यांचा विचार केला तर राजस्थानमधील एकूण बेरोजगारांची संख्या 30 ते 35 लाखांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. मोठ्याप्रमाणात अर्ज दाखल करण्यात आल्याच्या वृत्ताला राजस्थान स्टाफ सिलेक्शन बोर्डाचे सचिव भागचंद बधल यांनी दुजोरा दिला आहे. शिपाई पदांसाठी किमान पात्रता दहावीपर्यंतच्या शिक्षणाची असूनही उच्चशिक्षितांनी या पदासाठी अर्ज केले आहेत.

3 लाख लोकांची परीक्षा घेण्याची क्षमता

सध्या प्रशासनापुढे या उमेदवारांची परीक्षा घेण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे. राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा पद्धतीचा आवाका पाहिल्यास एका वेळी जवळपास 3 लाख उमेदवारांची परीक्षा आयोजित करण्याची क्षमता या राज्याकडे आहे. त्यामुळे आता 24 लाख लोकांची प्रवेश परीक्षा घेण्यासाठी ही प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये घ्यावी लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!