Homeसांस्कृतिकअक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय?...

अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी का करावं? यंदा सोनं खरेदीचा शुभ मुहूर्त काय? जाणून घ्या


अक्षय ट्रिटिया 2025: अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मानुसार शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभं मानलं जातं. पण गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोनं सर्वसामान्याच्या अवाक्याबाहेर गेलं आहे. अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तोपर्यंत सोनं स्वस्त होऊ शकते का, सवाल ग्राहक करत आहेत. पण अक्षय्यतृतीयेला सोनं खरेदी करण्याची परंपरा का निर्माण झाली? हे जाणून घेऊया.

यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पंचागानुसार यंदा अक्षय्यतृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग असून देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर या योगावर सोन्याचे दागिने खरेदी केल्यास अक्षय्य वृद्धी होते, असं मानण्यात येते.

अक्षय्य तृतीयेच्या अर्थ शुभ मुहूर्त आहे. याचा अर्थ या दिवशी कोणतेही काम मुहूर्त न पाहता करता येते. अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ व मंगल कार्यासाठी शुभ असतो. या दिवशी लग्न, मुंज, गृह प्रवेश यासारखे कार्य कोणताही मुहूर्त न पाहता करता येऊ शकतात. म्हणूनच या दिवशी लोक नवीन कामाची सुरुवात करतात.

सोनं खरेदी करण्याचा शुभं मुहूर्त?

यंदा अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संयोग घडत आहेत. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी सर्वार्थ सिद्धी योग बनतोय. संपूर्ण दिवस हा योग असणार आहे. त्याव्यतिरिक्त शोभन योग दुपारी 12 वाजून 02 मिनिटांपर्यंत आहे. रवि योग संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी सुरू होऊन संपूर्ण रात्रभर असणार आहे.

सोनं खरेदी करण्यासाठी सकाळी 5 वाजून 41 मिनिट  ते दुपारी 2 वाजून 12 मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ असणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा वेळ सकाळी 5 वाजून 41 मिनिट ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंतचा वेळ शुभ आहे.

पंचागानुसार, 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरू होऊन 30 एप्रिल 2025 ला दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी संपणार आहे. तिथीनुसार, 30 एप्रिलला पूजा आणि खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त आहे.

सोनं का खरेदी करावं?

सोनं हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं. यामुळं सोनं खरेदी केल्यास आपण साक्षांत लक्ष्मीच घरी आणतोय, अशी मान्यता आहे. यामागे एक पौराणिक कथादेखील आहे, देव आणि दानवांच्या समुद्रमंथनादरम्यानही सोने बाहेर आले होते. जे भगवान विष्णूंनी परिधान केले होते. या कारणास्तव यामुळे सोने माता लक्ष्मीनारायणाचं रूप मानलं जातं. याच कारणामुळे अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे, जर आपण अक्षय्य तृतीयेला सोने किंवा सोन्याचे दागिने विकत घेऊन घरी आणतो, तेव्हा त्यासोबत देवी लक्ष्मीही आपल्या घरात प्रवेश करते, असं मानलं जातं.

आणखी एका पौराणिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृत्तीयेच्या दिवशी महाभारताचे युद्ध संपले होते. तसंच, याच दिवशी विष्णुंनी भगवान परशुरामाचा अवतार घेतला होता. तसंच,भगवान विष्णूंनीही याच दिवशी नर नारायणाचा अवतार घेतला होता. या शुभ तिथीपासूनच श्रीगणेशाने महाभारताचे काव्य लिहिण्यास सुरुवात केली होती. यामुळेच या दिवसाला विशेष महत्त्व आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले!:कन्नडमध्ये भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हल्ला, चाकू हल्ल्यात 25 वर्षीय तरुणाची हत्या

0
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरात भरदिवसा दोन गटांमध्ये झालेल्या रक्तरंजित हाणामारीत एका 25 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली...

नागौद राजघराण्याच्या सुनेला गोळी मारल्याचा व्हिडिओ:पती बाबा राजाची वर्किंग पार्टनर सुनीताने गोळीबार केला, योगिता...

0
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नागौद राजघराण्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनेला नवे वळण मिळाले आहे. परसमनिया गढी येथे रूपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पत्नी...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:झाडे-झुडपे आपल्याला शुद्ध हवा, फळे, छाया देतात; त्यांच्याशिवाय नद्या, पर्वत,...

0
सध्या हिरवळ कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपण आपल्या ऋषि-मुनींच्या शिकवणी विसरलो आहोत. आपल्या शास्त्रांमध्ये वृक्षांना पूजनीय आणि...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...
spot_img

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...
error: Content is protected !!